आंबेडकर कॉलेजकडे जाणारा पुलिया रहदारी करीता सुरु करा - आ. किशोर जोरगेवार
चंद्रपूर : आ. जोरगेवार यांच्या निर्देशानंतर पथदिव्यांसाठी 22 लक्ष रुपये मनपा कडे वळते
वरोरा नाका चौकाकडून आंबेडकर कॉलेजकडे जाणा-या पुलियाचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी केवळ पथदिवे लावण्यात न आल्याने हा मार्ग रहदारी करिता बंद ठेवण्यात आला आहे. त्यामूळे बांधकाम विभागाकडे असलेले पथदिव्यांचे 22 लक्ष रुपये तात्काळ महानगर पालिकेकडे वळते करण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्यानंतर हे पैसे मनपाकडे वळते करण्यात आले आहे. आता जलदगतीने पथदिव्यांचे काम पूर्ण करुन 15 दिवसात हा मार्ग रहदारी करिता मोकळा करण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या आहे.
वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी वरोरा नाका पुलियावरुन आंबेडकर कॉलेजकडे जाण्याकरीता दूसरा पुलिया तयार करण्यात आला आहे. मात्र या पुलियाचे काम कासवगतीने सुरु असल्याने आमदार किशोर जोरगेवार यांनी बांधकाम विभागाच्या अधिका-यांची बैठक घेत सदर कामाच्या वस्तूस्थिती बाबत माहिती घेतली. यावेळी पथदिवे लावण्यात आली नसल्याने हा मार्ग बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधत या मार्गावर पथदिवे लावण्याच्या सुचना केल्यात. यासाठी लागणारा निधी बांधकाम विभागाने तात्काळ मनपाकडे वळविण्याचे निर्देशही सदर बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी बांधकाम विभागाला दिलेत. त्यानंतर बांधकाम विभागाने पथदिव्यांच्या कामासाठी 22 लक्ष रुपये निधी महानगर पालिकेकडे वळता केला आहे. 15 दिवसात पथदिव्यांचे काम पूर्ण करुन हा मार्ग रहदारी करिता मोकळा करावा अशा सुचनाही आ. जोरगेवार यांनी यावेळी दिल्या आहे. या मार्गावर वळण अधिक असल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामूळे पथदिवे लावत असतांना ते योग्य दिशेने लावण्यात यावे, मार्गावर दिशा दर्शक फलक लावण्यात यावे यासह अनेक महत्वाच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.