Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मार्च ०९, २०२१

अर्थसंकल्पात भटक्या विमुक्त प्रवर्गाला काय मिळाले?




✍️ खिमेश मारोतराव बढिये
अर्थसंकल्प अभ्यासक

करोनाच्या गडद छायेत आज सादर झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या ६२ व्या अर्थसंकल्पात भटक्या विमुक्त प्रवर्गाला काय मिळाले? याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला.
या अर्थसंकल्पात *भटक्या विमुक्तांना ३८१० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे*. सन २०१२ पासून तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांच्यापासून ५०० कोटी रुपयांपासून सुरू झालेले निधीचे वाटप व भटक्या विमुक्त चळवळीतील कार्यकर्त्यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे भटक्या विमुक्त प्रवर्गाला निधी वाटपात काही अंशी न्याय मिळाला, असे प्रथमदर्शनी वाटते. मात्र अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेल्या योजना प्रत्यक्षात राबतांना दिसत नाही, हे ही जळजळीत वास्तव आम्ही स्विकारले पाहिजे.
*आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात भटक्या विमुक्तांसाठी तब्बल ३८१० कोटी रुपये मंजूर करण्यात आले.*
१) यात राज्यात राजकीय अनास्थेचा बळी ठरलेली यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना गुंडाळून त्याऐवजी सावित्रीबाई फुले घरकुल योजना लागू करण्यात आली आहे. यासाठी ३२१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
२) महाज्योतीसाठी १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
३) पांढरा हत्ती ठरलेल्या वसंतराव नाईक भटके विमुक्त महामंडळासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
४) भटक्या विमुक्तांच्या वस्त्यांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी २५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले.
५) मत्स्य व्यवसाय उद्योजकांसाठी १०० रुपये मंजूर करण्यात आले आहे.
६) गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार मंडळासाठी कारखान्याकडून जमा होणाऱ्या १० टक्के निधीवर तितकाच निधी देण्याचे मान्य केले आहे. मात्र या ऊसतोड भटक्या विमुक्त बांधवांसाठी ठोस अशा निधीची तरतूद करण्यात नाही.
७) बंजारा समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या पोहरादेवीच्या विकासासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचे सांगितले. मात्र ठोस असा निधीची तरतूद मात्र करण्यात आली नाही.
८) निधी अभावी भटक्या विमुक्तांच्या थकीत असलेल्या शिष्यवृत्ती संदर्भात कुठलीही निधीची तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे यापुढे भटक्या विमुक्त समाजातील मुलाबाळांना शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी शिष्यवृत्तीवर जोरकसपणे लढा उभारावा लागेल. एवढे मात्र खरे.
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
भटक्या विमुक्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी केवळ संघटनेच्या भरवशावर समाजांनी अवलंबून राहू नये. तर लढा व्यापक करण्यासाठी स्वतः समाज संघटनेसोबत मैदानात उतरले पाहिजे. एवढे मात्र खरे.


अर्थसंकल्पाचे विश्लेषण करण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. मात्र यातून सत्य मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


(आपल्या प्रतिक्रिया व सूचना स्वागतार्ह आहे)

✍️ खिमेश मारोतराव बढिये
अर्थसंकल्प अभ्यासक
भटक्या विमुक्त चळवळीतील कार्यकर्ता
9423640394, 9096840741

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.