मालगाडीच्या धडकेत वाघाचा मृत्यू गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वेमार्गावरील घटना
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.8 मार्च:-
पिंडकेपार गोंगले रेल्वे मार्गावर आज 8 मार्च सोमवारच्या सकाळी 8 वाजताच्या सुमारास मालगाडीच्या धडकेत एका वाघाचा मृत्यू झाला. गोरेगाव वनविभागाच्या अधिकार्यांनी घटनेचा पंचनामा करून घटनास्थळापासून काही दूर अंतरावर वाघाचा अंतिम संस्कार केला.गोरेगाव वन परिक्षेत्रांतर्गत येणार्या गोंदिया-चंद्रपूर रेल्वे मार्गावर पिंडकेपार गोंगले रेल्वे स्थानक आहे. येथील पोल क्रमांक 1025 जवळ मालगाडीच्या धडकेत वाघाचा मृत्यू चंद्रपूरवरून गोंदियाकडे मालगाडी येत होती, या मालगाडीच्या समोर वाघ आला. यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.मृत वाघाची वय जवळपास 1 वर्ष असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच उपवन संरक्षक कुलराज सिंह, एसीएफ आर.आर. सदगीर, नागझिरा अभयारण्याचे उपसंचालक पूनम पाटे, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, गोरेगाव वन विभागाचे क्षेत्र सहायक धुर्वे, स्वप्नील दोनोडे आदि घटनास्थळी पोहचले. घटनेचा पंचनामा केल्यानंतर वाघाचा अंतिम संस्कार करण्यात आला.
तीन दिवसांपूर्वीच गंगाझरी येथे रेल्वे मार्गावर ट्रेनच्या धडकेमुळे दोन अस्वलांचा मृत्यू झाला होता. वन्यप्राण्यांचा अशाप्रकारे नाहक बळी जात असल्याने रेल्वे लाईनच्या दुतर्फा सुरक्षा व्यवस्था करून वन्यजीवांचे संरक्षण करावे, मागणी वन्यप्रेमी नागरिकांकडून होत आहे.या घटनेने वन्यजीवांच्या संरक्षणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
वनविभाग या घटनेचा पुढील तपास करीत आहे.