एकनाथ साळवे यांच्या जयंती निमित्ताने सामाजिक कार्य करण्याचा संकल्प करावा- सरपंच सुभाष ताजने
राजुरा :- महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय राजुरा हे येथे दिनांक 30 मार्च 2021 रोज मंगळवार ला शेतकरी, शेतमजूर,आदिवासी, वंचितांचे नेते ,"एन्काऊंटर" या कादंबरीचे लेखक, तथा सामाजिक कार्यकर्ते ,माजी आमदार डॉ .ऑड एकनाथ साळवे यांची जयंती कोरोना वैश्विक महामारीचे नियम पाळून हर्ष उल्लासाने साजरी करण्यात आली.
सदर जयंती कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याद्यापक श्री सुधाकर उईके , प्रमुख अतिथी ग्रा . सह.शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा ग्रामपंचायत बामणीचे सरपंच मान. श्री सुभाष ताजने , पर्यवेक्षक डी. लक्ष्मणराव जेष्ठ शिक्षक श्री अशोक चिडे सर, श्रीमती मालती उरकुडे मॅडम यांची उपस्थिती होती
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. एकनाथ साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याची महती पटवून देणारे गौरवगीत डाहुले सर, मेश्राम सर मडावी सर, पुणेकर सर यांनी गायन केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मान. उईके सर यांनी केले.
एकनाथ साळवे यांनी गोरगरीब आदिवासी मुले शिक्षणापासून वंचित राहू नये या उदान्त हेतूने ग्रा. सह.शिक्षण मंडळाची स्थापना करून राजुरा येथे मराठी माध्यमाची शाळा निर्माण करून आदर्श निर्माण केला असून बल्लारपूर येथे विविध भाषिकांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी या करिता हिंदी, उर्दू, तेलुगू माध्यमांच्या शाळा स्थापन करून बहू भाषिकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.
त्यांनी सामाजिक क्षेत्रात केलेली कामगिरी जनतेच्या नेहमी स्मरणात राहील बामणी ग्रामपंचायत चे सरपंच तथा संस्थेचे सचिव सुभाष ताजने हे बोलत होते. तसेच साहेबांचा जन्म दिवस हा संकल्प दिन म्हणून साजरा करावा. या दिवसाला संस्थेतील कार्यकर्त्यांनी एक चांगला संकल्प करावा असे ही विचार ताजने सर यांनी मांडले. यावेळी संजय निखाडे सर यांनी डॉ एकनाथ साळवे यांचा संपूर्ण जीवनपट सांगून त्यांच्या गावातील प्रथम क्रमांकाची माहिती दिली तर मेश्राम सर , श्री डाहूले सर यांनी साहेबांच्या कार्याची प्रेरणा घेऊन संस्थेचे कार्य उत्तम रित्या पार पाडू असे भाषणातून विचार मांडले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती गोरे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेतील संपूर्ण शिक्षक,शिक्षिका , शिक्षकेत्तर कर्मचारी तथा विद्यार्थी उपस्थित होते. आभारप्रदर्शन मेश्राम सर यांनी करून शेवटी राष्ट्रवंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.