Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च ०३, २०२१

नागपूरच्या समता प्रतिष्ठान संस्थेच्या कामांची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक - सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे



नागपूरच्या समता प्रतिष्ठान संस्थेच्या कामांची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक - सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

            मुंबईदि. 3 : नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान संस्थेच्या कामांची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक नेमण्यात येईल. या प्रकरणी प्रथम दर्शनी दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईलअसे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

            सदस्य सुनील प्रभू यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना सामाजिक न्यायमंत्री श्री.मुंडे म्हणाले कीया संस्थेमार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त जे कार्यक्रम घेण्यात आले त्याच्या खर्चामध्ये ताळमेळ लागत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची विशेष चौकशी पथकामार्फत केली जाईलअसेही श्री. मुंडे यांनी सांगितले.

            यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीससदस्य सर्वश्री नाना पटोलेसुधीर मुनगंटीवार यांनी भाग घेतला.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.