भाविकांना केंद्रस्थानी ठेवून विकास करावा - आ. किशोर जोरगेवार
माता महाकाली मंदिराच्या विकास आराखड्याचे करण्यात आले सादरीकरण,
नागरिकांनी केल्या महत्वाच्या सूचना.
माता महाकाली आमची दैवत आहे. त्यामूळे येथील विकास कामात लोकांच्या सूचना अभिप्रेत आहे. येथे राज्यासह परराज्यातून येणा-या भाविकांचीही संख्या मोठी आहे. त्यामूळे त्यांच्या सोई सुविधा लक्षात घेत भाविकांना केंद्रस्थानी ठेवून हे विकास काम करावे अशा सुचना विकास आरखडा सादरीकरण दरम्याण आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.
मोठा निधी खर्च करुन माता महाकाली मंदिराच्या पूर्णविकास व सौंदर्यीकरणाचे काम केल्या जाणार आहे. यात भाविकांच्यासह नागरिकांच्या सुचना लक्षात घेण्यासाठी काल रविवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने महाकाली मंदिराच्या सभागृहात या कामाच्या विकास आरखड्याचे सादरीकरण करण्यात आले. अनेक महत्वाच्या सूचना नागरिकांनी केल्या असून या सुचनांची दखल घेण्यात आली आहे. यावेळी आचार्य प्रवर श्री संत मनीष महाराज, कार्यकारी अभियंता संतोष जाधव, उपकार्यकारी अभियंता संजय मेंढे, मधुसूदन रुंगठा, गौरीशंकरजी मंत्री, सुनील महाकाले, प्रकाश महाकाले, आशाताई महाकाले, डॉ. गोपाल मुंधडा, डॉ. पालीवाल, नगरसेवक नंदू नागरकर, माजी नगरसेवक बलराम डोडानी, नगरसेवक पप्पू देशमुख, अजय जैस्वाल, धनंजय दानव, प्रभाकर दिवसे, रामजीवन परमार, नगरसेविका सुनिता लोढीया, यंग चांदा ब्रिगेड, शहर संघटिका, वंदना हातगावकर, सायली येरणे, कुक्कु सहानी, अरविंद मुसळे, सुरेश राठी, प्रभाकर मंत्री, प्रवीण कुलटे, हेरमण जोसेफ, मुन्ना जोगी यांच्यासह चंद्रपूर शहरातील भाविकांची तसेच महाकाली सेवेकरी मंडळी यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी महत्वांच्या बाबींवर प्रकाश टाकत हे विकास काम होत असतांना याबाबत भाविक व नागरिकांच्या काय कल्पना आहेत हे जाणून घेण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगीतले. कोणत्याही विकास कामात नागरिकांचे मत जाणून घेतल्या गेली पाहिजे, त्यांच्या योग्य सुचनांचा स्विकार केला पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. या प्रसंगी उपस्थितांनी अनेक महत्वाच्या सूचना केल्यात यातील योग्य सुचना या आराखड्यात कार्यान्वीत करण्यात आल्या. यापूर्वी अनेक कामे पुरातत्व विभागाच्या हद्दीत करण्यात आली आहे. त्या कामांसाठी पूरातत्व विभागाने अडथळा निर्माण केला नाही. मात्र लाखो लोकांचे श्रध्दास्थान असलेल्या माता महाकाली मंदिराच्या कामासाठी पूरातत्व विभाग अडथळा निर्माण करत असल्याने आमदार किशोर जोरगेवार यांनी संताप व्यक्त केला. हा सर्व अडथळा दूर करण्याच्या दिशेने शासनस्तरावर माझे प्रयत्न सुरु असल्याचेही ते यावेळी म्हणाले, दरम्याण आयोजित कार्यक्रमात करण्यात आलेल्या महत्वाच्या सुचनांमधील 64 फुटांचा ध्वज, 81 फुटांची माता महाकालीची मुर्ती, गाळे धारकांना मोठी दुकाने, यज्ञ कुंड तयार करणे यासह इतर सूचना या आराखड्यामध्ये कार्यन्वीत करण्यात आल्या. तसेच या कामाची कमीत कमी खर्चामध्ये देखभाल करण्यात यावी, येथील खुल्यामंचावर वर्षभर धार्मीक व सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात यावे, नागरिकांना माता महाकालीच्या आरतीचे थेट दर्शन घेता यावे या करीता नियोजन करण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या. या प्रसंगी स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.