घूग्घूस येथे कोरोना लसीकरण केंद्र सुरु करण्यात यावे, यंग चांदा ब्रिगेडची मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदन
लोकसंख्या लक्षात घेता घूग्घूस शहरात कोरोना लसीकरण केंद्र सुरु करण्यात यावे अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून सदर मागणीचे निवेदन त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना देण्यात आले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे घूग्घूस शहर संघटक विलास वनकर, राशिद हुसेन, हरमन जोसेफ, राजू नातर आदिंची उपस्थिती होती.
चंद्रपूरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. यावर उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने विविध उपायोजना आखून देण्यात आल्या आहेत. तसेच 45 व 60 वर्षावरील नागरिकांना कोरोना लस दिली जात आहे. मात्र हे लसिकरण केंद्र चंद्रपूरात असल्याने बाहेरील नागरिकांना लस घेण्यासाठी चंद्रपूरला यावे लागत आहे. त्यामूळे घूग्घूस शहराची लोकसंख्या लक्षात घेता हे लसीकरण केंद्र घूग्घूस येथेही सुरु करण्यात यावे अशी मागणी आहे. घुग्गुस हे चंद्रपूर जिल्हातील जवळपास ५० हजार लोकसंख्या असलेले औद्योगिक शहर आहे. त्या दृष्टीने तेथील आरोग्य व्यवस्था अल्पशी आहे. त्यामूळे येथील नागरिकांच्या सुवेधेसाठी कोरोना लसीकरण केंद्र घूग्घूस येथे सुरु करण्यात यावे अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.