Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च २०, २०२१

देशमुखांवर टांगती तलवार; गृहमंत्रीपद जयंत पाटीलकडे जाणार

अनिल देशमुखांच्याच आदेशावरून वाझेंची वसुली, परमबीर सिंहांच्या पत्रात काय?

परमबीर सिंह पत्राबाबत राज्यपालांची भेट घेणार : प्रकाश आंबेडकर



मुकेश अंबानी स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात बॅकफूटवर गेलेल्या ठाकरे सरकारमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या बदलीनंतर आता थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरच टांगती तलवार आहे. त्यातच परमबीर सिंग यांनी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनी निलंबित एपीआय सचिन वाझे यांना 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक दावा, परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. यामुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदावरुन हटवण्याची सर्वाधिक शक्यता आहे. अनिल देशमुख यांचा राजीनामा घेऊन जयंत पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे 

मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे, असा खुलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. 


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे.  गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया मनसे नेते राज ठाकरे यांनी दिली आहे. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.