Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च २१, २०२१

‼ चारठाणा : उद्धव्स्त पण अप्रतिम मंदिर असलेल गाव ‼

चारठाणा : उद्धव्स्त पण अप्रतिम मंदिर असलेल गाव  ‼


दि. २१ मार्च २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3c1TTrg
मराठवाडा ही प्राचीन संस्कृतीचे संपन्न असे वैभव सांगणारी भूमी आहे. महाराष्ट्राचे  आद्य आणि सर्वात दीर्घकाळ टीकलेल्या सातवाहन घराण्याची ही भूमी. सातवाहन, वाकाटक, कलचुरी, चालुक्य, राष्ट्रकुट आणि यादव राज्यांच्या काळातील कितीतरी समृद्ध संपन्न पुरातत्वीय पुरावे इथे आढळतात. यातीलच एक यादवांच्या काळातील (11 वे ते 13 शतक) 365 मंदिरे असलेले गाव म्हणजे औरंगाबाद-जालना-जिंतूर रस्त्यावरील चारठाणा (ता. जिंतूर, जि. परभणी).

चारठाणा : उद्धव्स्त पण अप्रतिम मंदिर असलेल गाव

            इथे असलेल्या पुरातन मंदिरांच्या आणि भग्नावाशेषांच्या ठेव्यामुळे ते अनेक इतिहासतज्ञाना आणि पुरातन वास्तू प्रेमीना माहिती आहे. गावात सुंदर तीन मजली लाकडी वाडे आहेत. हे जूने वाडे वास्तुशास्त्राचे उत्कृष्ठ असे नमुने आहेत. खासगी मालकीचे हे वाडे डागडुजी करून त्यांचे जतन करण्याची नितांत आवश्यकता आहे.
चारठाण्याचे मूळ नाव चारूक्षेत्र. चारू म्हणजे सुंदर.
हा सगळा भाग राष्ट्राकुटान्च्या अंमलाखाली येत असे (इसविसनाचे ६वे ते ९वे शतक)राष्ट्रकुट सम्राट अमोघवर्ष्र. ह्याची आई चारुगात्रीदेवी ही मोठी शिवभक्त होती. 
तिने म्हणे ह्याभागात एक सहस्त्र शिवमंदीर उभारण्याचा संकल्प सोडला होता (हे तिचे जन्म गाव असावे किंवा इथे काही शुभ घटना घडली असावी)तिची ही इच्छ राजाने पूर्ण केली. आणि खरोखरच ह्यागावात जवळपास ३६० लहान मोठी शिव मंदिरे आहेत.बरीच जमिनीखाली गाडली गेलेली आहेत. १९९३ च्या भूकंपानंतर इथल्या अनेक मंदिरांची बरीच नासधूस झाली आहे पण नवीन बरीच मंदिरे सापडलीही आहेत. अजूनही सापडतात अक्षरश: लोकांच्या घरात, अंगणात शेतात सापडतात. भारतीय पुरातत्व खाते जप्त करेल, घेऊन जाईल, जागा बळकावेल अशा भीतीने लोक सांगत नाहीत किंवा सापडलेली शिवलिंग, मुर्त्या बाहेर काढून ठेवतात. अशी मूळ जागा सोडलेली, रस्त्याच्या कडेला, झाडाखाली, वळचणीला पडलेली शिल्प गावात जागोजागी खूप दिसतात प्रसिद्ध म्हणजे दीपमाळ किंवा विजयस्तंभ.हा जवळ पास ४५ फुट उंच आहे.
 गावकरी जरी ह्याला दीपमाळ म्हणत असले तरी हा दीपमाळ वाटत नाही शिवाय आजूबाजूला तेवढे मोठे मंदीर किंवा त्याचे भग्नावशेषही नाहीत. आश्चर्य म्हणजे हा अख्खाच्या अख्खा उभा मातीखाली गाडला गेलेला होता.मुसलमान आक्रमकांपासून रक्षण करण्यासाठी तो लोकांनीच माती खाली गाडला. तसेच इतर आणखी ही काही मंदीरेही मातीखाली गाडली.हा इतका उंच,सुंदर, आणि भव्य आहे कि ह्याच्याकडे कितीहीवेळ बघत राहिले तरी मन भरत नाही पण वर बघून बघून मान मात्र चांगलीच दुखून येते. हा बऱ्याच चांगल्या स्थितीत टिकून आहे त्यामुळे तत्कालीन कला आणि नक्शीकामातले ट्रेंड्स कळून येतात. ह्या स्तंभाच्या आसपासचा परिसर मात्र अत्यंत बकाल आहे, झाड झुडप,चिखल, खड्डे त्यात लोळणारी डुकरं, गाई बैलांच्या आणि कुत्र्यांच्या विष्ठा इतस्तत:विखुरलेल्या, त्यांचा उग्र दर्प ह्यामुळे तिथे जाणे अवघड होऊन बसते.
स्त्म्भाच्या वरच्या बाजूला असलेले हे रुद्राक्ष आणि घंटाची नक्षी अत्यंत अप्रतीम आणि नाजूक आहे. ४० फुटावरून ती नुसती लटकवलेली दिसते. मागची दगडी कॉलर दिसतच नाही. फोटो झूम करून पाहिल्यावर ही पातळ दगडी कॉलर दिसते.अत्यंत पातळ आणि परफेक्ट वर्तुळाकार आहे ही.


ह्या विजय स्तंभाच्या जवळच उकंडेश्वर महादेवाचे मंदीर आहे. भीती वाटावी असे तडे आणि भेगा गेल्यात. हे सगळे नष्ट व्हायच्या बेतात आहे
मन्दीराबाहेरच्या सप्त मातृका,ह्यांनाच सात आसऱ्या म्हणतात. सर्वसाधारणत: सप्त मातृकांबरोबर गणेशही असतो पण इथे नाही दिसला.
गोकुलेश्वर मंदिराबाहेर अशा भग्न मुर्त्या लोकांनीच आणून ठेवल्या आहेत. त्या अत्यंत हलाखीत आणि दुर्लक्षित अवस्थेत आहेत. हा अनमोल ठेवा नष्ट होईल किंवा चोरी होईल.
गावकरी त्यांच्या पद्धतीने हा ठेवा जतन करतात पण त्यांच्याकडे शास्त्र शुद्ध ज्ञान नाही आणि इतर व्यवधानं आहेतच. एकंदरीत हा ठेवा धोक्यात आहे.एका छोट्याश्या खेड्याच्या आजूबाजूला इतके प्रचंड शिल्प वैभव आहे .
कसे जाल:: परभणी शहरापासून साधारणत: 62 किमी अंतरावर हे ठिकाण आहे. परभणी येथून चारठाणसाठी एसटीची व्यवस्था आहे. जवळचे रेल्वेस्थानक सेलू. विमानतळ हे आहे.
 __________________________
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
⛱ माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  ⛱      
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.           _爪卂卄丨ㄒ丨


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.