📣 व्हिडिओ: १९९७ मध्येच बॉबी देओलला माहिती होता कोरोना
________________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
________________________________
कोरोनाला येऊन आता जवळपास एक वर्ष उलटलं आहे. हात धुणे, सॅनिटायझिंग करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, कोरोनाच्या वारंवार टेस्ट करणे, साफसफाई ठेवणे या गोष्टी आता सामान्य झाल्या आहेत. जवळपास एक वर्षापूर्वी आपण सगळेच या बदलाला स्विकारायला तयार नव्हतो. पण आता मात्र हे सगळं अतिशय नॉरमल झालं आहे. पण तुम्हाला माहित आहेका अभिनेता बॉबी देओलला या सगळ्या गोष्टी आधीपासूनच माहित होत्या. 1997 मधे म्हणजे जवळपास चोविस वर्षांपूर्वीच त्याला कोरोना ची चाहूल लागली होती. इतकच नाही तर आताची RT-PCR टेस्ट ही त्याने त्यावेळी केली होती.बॉबीचा एक व्हिडीयो तुफान व्हायरल होत आहे. ज्यात तो चक्क अभिनेत्री एश्वर्या राय बच्चनची कोरोना टेस्ट करत असल्याचं नेटकरी म्हणतायत. 1997 साली आलेला और प्यार हो गया Aur Pyar Ho Gaya चित्रपटातील हा व्हिडीयो आहे.