केंद्र शासनाच्या विरोधात नारे निर्देशने
नागपूर / अरुण कराळे ( खबरबात)
महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचा सुचनेनुसार दत्तवाडी चौकात केंद्र शासनाच्या कृषी कायद्या विरोधात दत्तवाडी चौकात कोविड -१९च्या सर्व नियमाचे पालन करत एक दिवशीय उपोषण शुक्रवार २६ मार्च रोजी सकाळी ११ ते ४ वाजतापर्यंत करण्यात आला.
नागपुर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नानाभाऊ गावंडे,अखिल भारतीय कांग्रेस कमिटीच्या सदस्या कुंदा राऊत,जि.प . शिक्षण सभापती भारती पाटील , पं . स .सभापती रेखा वरठी, नागपूर जिल्हा काँग्रेस कमेटी उपाध्यक्ष भीमराव कडू, जिल्हा महासचिव दुर्योधन ढोणे , जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील ,नागपुर तालुका अध्यक्ष प्रकाश कोकाटे,हिंगणा विधानसभा युवक काँग्रेस कमिटी अध्यक्ष अश्विन बैस,वाड़ी शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष शैलेश थोराने यांच्या प्रमुख उपस्थित राष्ट्रपिता महात्मा गांधी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटोला माल्यार्पण करून उपोषणाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी सोनेगाव निपानी येथील सरपंच तेजेस्विनी धुर्वे,उपसरपंच कृष्णा सरीन, सुराबर्डी सरपंच ईश्वर गणवीर,उपसरपंच मुकेश महाकाळकर, दवलामेटी उपसरपंच प्रशांत केवटे, अशोक गडलिंगे,प्रशांत कोरपे,प्रमोद गिरपूंजे,आशीष पाटिल,पियूष बांते,मीनाक्षी पाटिल,धनराज काळमेघ, पंकज फलके,निशांत भरबत,योगेश कुमकुमवार,साधना कराळे,मनीषा सावरकर, फलुन पटले,अरुणा पगाड़े,संजय निस्वादे,गौतम धोक,ईशान जंगले,निखिल कोकाटे,विनोद बांगरे, भगवान दलवी, मिथुन वायकर,वि.के.महिंद्रा, मंगेश पोहनकर, मुकुंद झाडे,जगदीश चदू आदि प्रामुख्याने उपस्थित होते.