Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च २०, २०२१

हे विधेयक मेगा सुधारणा करणारे नसून मेगा भ्रष्टाचार वाढीस पूरक : खासदार बाळू धानोरकर

  हे विधेयक मेगा सुधारणा करणारे नसून मेगा भ्रष्टाचार वाढीस पूरक : खासदार बाळू धानोरकर 



 कोळसा क्षेत्रातील 'कोल इंडिया लिमिटेड' सारख्या मोठ्या संस्था संपतील

 खाण व खनिजे (विकास व नियमन) अधिनियम, 2021 मध्ये  विधेयकावर चर्चा 


चंद्रपूर : कोळसा घोटाळ्यावर आरोप करून मोदी सरकार सत्तेत बसले. परंतु खाण व खनिजे (विकास व नियमन) अधिनियम, 2021 मध्ये  सरकारच्या म्हणण्यानुसार, विधेयकात प्रस्तावित केलेल्या दुरुस्तीचा उद्देश खाणींच्या क्षेत्रात मोठ्या सुधारणा करणे, पारदर्शकता आनणे व लिलावासाठी मोठ्या संख्येने खाणी उपलब्ध करुन देणे आहे. वास्तविकता यात  भ्रष्टाचार आणखी वाढणार आहे. हे विधेयक मेगा सुधारणा करणारे नसून भष्ट्राचार वाढीस पूरक आहे असा आरोप खासदार बाळू धानोरकर यांनी करत या विधेयकाला लोकसभेत त्यांनी विरोध दर्शविला. 
                      मोदी सरकार मोठ्या प्रमाणात खाजगीकरण करीत आहे. शासकीय यंत्रणा विकण्याच्या बाजार त्यांनी मांडला आहे. त्यासोबतच मोठ्या घोषणा करून त्या पूर्ण करण्यात सपसेल अपयशी ठरले आहे.  मोदी सरकार आल्यानंतर खाण क्षेत्रात सरकारने अनेक चुकीचे निर्णय घेतले. यापुर्वीही अध्यादेशाच्या माध्यमातूनही बदल केले गेले आहे, परंतु हे बदल पूर्णपणे फसले आहे. सरकारने १००० खाणींचे लक्ष्य निश्चित केले होते, त्यापैकी गेल्या वर्षात केवळ 100 खाणींचा लिलाव झाला. खाण व खनिजे (विकास व नियमन) अधिनियम, 2021 मध्ये सरकारच्या म्हणण्यानुसार, विधेयकात प्रस्तावित केलेल्या दुरुस्तीचा उद्देश खाणींच्या क्षेत्रात मोठ्या सुधारणा करणे, पारदर्शकता आणणे व लिलावासाठी मोठ्या संख्येने खाणी उपलब्ध करुन देणे आहे. वास्तविकता यात  भ्रष्टाचार आणखी वाढणार आहे.
             या विधेयकात देण्यात आलेल्या भाडेपट्टीच्या लिज अवधीच्या तरतुदीमुळे, खाजगी कंपन्या स्वत:च्या मनमानीपणे खाणकाम करतील. ज्याचा जैवविविधतेवर सर्वात वाईट परिणाम होईल आणि त्याच वेळी खाणींच्या आसपास राहणाऱ्या लोकांच्या जीवनावरही विपरीत परिणाम होईल. शिवाय कोळसा क्षेत्रातील 'कोल इंडिया लिमिटेड' सारख्या मोठ्या संस्था संपतील असेही खासदार धानोरकर म्हणाले

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.