Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च २०, २०२१

भाजपात बूथ प्रभारी व शक्तिकेंद्र प्रमुख यांना महत्वाचे स्थान-डॉ.मंगेश गुलवाडे

भाजपात बूथ प्रभारी व शक्तिकेंद्र प्रमुख यांना महत्वाचे स्थान-डॉ.मंगेश गुलवाडे



 पूर्व (बंगाली कॅम्प) मंडळात बूथ प्रभारी व शक्तिकेंद्र प्रमुखांची बैठक संपन्न

  महानगर जिल्हा भाजपा तर्फे बूथ रचना सक्षम  करण्याचे कार्य सुरू आहे.या निमित्ताने पूर्व (बंगाली कॅम्प)मंडळात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले.  भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे म्हणाले, भाजपात बूथ प्रभारी व शक्तीकेंद्र प्रमुख यांना महत्वाचे स्थान असून  कार्यशैलीच्या जोरावरच  बूथ रचना मजबूत होऊ शकते. भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर बूथ संयोजक तथा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे यांनी बूथ प्रभारी व शक्तीकेंद्र प्रमुख यांनी बूथ रचनेचा पुढील टप्पा लवकरात-लवकर पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. बैठकीला भाजपा महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार,महामंत्री रवींद्र गुरनुले,महिला व बालकल्याण सभापती चंद्रकलाताई सोयाम,झोन सभापती अंकुश सावसाकडे,मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर,नगरसेविका जयश्रीताई जुमडे, वंदनाताई जांभुळकर,अनु:जाती मोर्चा अध्यक्ष धम्मप्रकाश भस्मे,अनु:जमाती मोर्चा अध्यक्ष धनराज कोवे,ओबीसी मोर्चा महानगर महामंत्री शशिकांत मस्के,मंडळ महामंत्री मनोरंजन रॉय,गिरीधर येडे,रामजी हरणे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.