Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मार्च ११, २०२१

कृषी ऊर्जा धोरणामुळे शेतकऱ्यांचं स्वप्न साकार होणार - ऊर्जामंत्री डॉ.नितीनराऊत

कृषी ऊर्जा धोरणामुळे शेतकऱ्यांचं स्वप्न साकार होणार - ऊर्जामंत्री डॉ.नितीनराऊत



थकबाकीमुक्त व नवीन जोडणी घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान


नागपूर,दि.११,मार्च २०२१: शेतीसाठी दिवसाही पूर्णवेळ अखंडित वीज आणि वीज बिल थकबाकीतून पूर्णपणे मुक्ती हे शेतकऱ्यांचे स्वप्न महाकृषी धोरणामुळे पूर्ण होणार आहे त्यामुळे या धोरणाचा शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले.उमरेड तालुक्यातील उदासा येथे कृषी ऊर्जा पर्वा निमित्त महावितरणच्या वतीने आयोजित कृषी ग्राहक मेळाव्यात ऊर्जामंत्री बोलत होते.या प्रसंगी थकबाकीमुक्त तसेच नवीन वीज जोडणी मिळालेल्या शेतकऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
महाविकास आघाडी सरकारने शपथविधी समारंभाला शेतकऱ्यांना आवर्जून निमंत्रित केले होते.हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि शेतकऱ्यांच्या थकबाकीमुक्तीचे आणि दिवसाही पूर्णवेळ वीज मिळण्याचे स्वप्न महाकृषी ऊर्जा धोरणामुळे साकार होणार आहे. त्यामुळे या पर्वात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे,असे आवाहन या वेळी ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले.
या मेळाव्यात माजी ऊर्जा राज्य मंत्री राजेंद्रदादा मुळक,आमदार राजूभाऊ पारवे,,जिल्हा परिषद सभापती नेनावती माटे, पंचायत समिती सभापती रमेश कुमनाके, उपसभापती सुरेश लेंडे,उदासा सरपंच कविता दरने,जि प सदस्य माधुरी गेडाम,सुनीता ठाकरे,पुष्पलता डांगरे,गीतांजली नागभीडकर,जयश्री देशमुख,राजू सुटे, इत्यादी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.आ. राजुभाऊ पारवे यांनी गावाच्या विकासासाठी या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे,असे आवाहन केले.महावितरण कडून नुकसानीत असतानाही शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीज दिली जाते.त्यामुळे शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन राजेंद्र मुळक यांनी केले.
या मेळाव्यात दत्तू बारसागडे,पदमाकर तांबे,मंगेश शिंदे,मारोती अबलमकर,गजानन दरणे,कमलाकर गिरडकर,तुलाराम गायकवाड, फुलाराम नागोसे,निर्मलाबाई पिल्लेवान,रागो बेलकुडे यांनी आपल्या शेतीपंपाच्या थकबाकीची रक्कम एकरकमी भरल्याबद्दल डॉ. नितीन राऊत व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांना थकबाकी मुक्तीचे सन्मानपत्र  प्रदान करण्यात आले.
तसेच मोहन म्हैसकर,नत्थु भुसारी,देवराव गजघाटे,अरुणा ढेंगरे,पुरूषोत्तम भिवापूरकर या शेतकऱ्यांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले.
माहिती पुस्तिकेचे विमोचन उर्जामंत्र्याच्या हस्ते करण्यात आले.प्रास्ताविक नागपूर प्रादेशिक विभागाचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी केले.
नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके,अधीक्षक अभियंता नारायण आमझरे,उमरेड विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप घाटोळ,उपकार्यकारी अभियंता दिलीप राऊत,सहाय्यक अभियंता गिरीश मडामे उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.