झाशीनगर कोअर( कॅन्टोन्मेंट) झोन जाहीर तालुक्यात 82 नागरिक कोरोना बाधित
नवेगावबांध येथे 8 सक्रिय कोरोना रुग्ण
कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने झाशीनगर गावाच्या सर्व सीमा सील
उपाययोजना करण्याविषयी उपविभागीय अधिकारी सोनाले यांनी घेतली गावदक्षता समितीची बैठक
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.30 मार्च:-
झाशीनगर येथील 22 व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे या गावाला आज दिनांक 30 मार्च रोज मंगळवार ला कोअर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. परिसरातील दोन गावे बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. आता तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या 82 एवढी झाली आहे .
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झाशीनगर येथील काही व्यक्ती कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याने त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा आला. त्यामुळे संपूर्ण झाशीनगर या गावास ईपीक सेंटर बनवून संपूर्ण गाव कन्टोनमेंट प्लॅन कार्यान्वित करण्याकरिता कोरोना आजाराच्या प्रतिबंध करिता प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सामावेश करण्यात आला. येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ प्रभावाने बंद करून सदर भागाच्या सीमा आवागमनासाठी बंद करण्यात आले आहे.तर मौजा चुटिया,मौजा भसबोडन टोला हे गाव बफर झोन म्हणून समाविष्ट करण्यात येऊन, प्रतिबंधित क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले.झाशीनगर येथे 22 व्यक्तीकोरोना बाधित आढळल्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. कोरोणापासून दूरअसलेला अर्जुनी मोरगाव तालुका हळूहळू कोरोनाच्या कवेत जात आहे.आज अर्जुनीमोर तालुक्यात 82 नागरिक कोरोना बाधित आहेत.आज तीन व एक देवरी येथे स्थानिक व्यक्ती कोरोना बाधित आढळ्याने नवेगावबांध येथे सक्रिय बाधितांची संख्या 8 झाली आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. झाशीनगर येथील काही व्यक्ती कोरोना बाधित असल्यामुळे झाशीनगर या गावाचा कोअर झोन( कन्टोनमेंट झोन) मध्ये समावेश करण्याची घोषणा आज दिनांक 30 मार्च रोज मंगळवारला अर्जुनी मोरगाव च्या उपविभागीय अधिकारी तथा विभागीय दंडाधिकारी शिल्पा सोनाले यांनी एका आदेशान्वये जाहीर केले आहे. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव इतर भागात पसरू नये, याकरिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने तसेच नागरिकांचे हीत व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून covid-19 विषाणूचा संसर्ग टाळण्याकरता झाशीनगर चा कोअर झोन प्रतिबंधित क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. या क्षेत्रात जाणारे येणारे सर्व मार्ग तात्काळ प्रभावाने बंद करण्यात आले आहे. तसेच आवागमनास सीमा बंद करण्यात आलेले आहे. सदर क्षेत्रातील लोकांना बाहेर जाण्यास व बाहेर क्षेत्रातील लोकांना इथे प्रवेश करण्यास पूर्णतः प्रतिबंधित करण्यात आलेला आहे.
आज 30 मार्चला अर्जुनी मोरगाव च्या उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी शिल्पा सोनाले यांनी झाशीनगर येथील गाव समिती ची सभा घेतली.गावात डोअर टू डोअर सर्व्हेक्षण, ग्रामपंचायत मध्ये कोरोना तपासणी शिबीर घेण्याचे या सभेत ठरवून, कंटोंमेन्ट झोनमध्ये करण्यात येणाऱ्या उपाययोजना या विषयी चर्चा केली व मार्गदर्शन केले. यावेळी अर्जुनी मोरगाव चे तहसीलदार विनोद मेश्राम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय राऊत,वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेंद्र खोब्रागडे, डॉ. प्रवीण दखणे, चीचगड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल तावडे,तलाठी सोना मोहूर्ले, ग्रामसेवक खडसे,सरपंच आशा गडपार,उपसरपंच रवींद्र नाईक, संजीवकुमार गुरनुले,आरोग्य सेविका नंदा केंद्रे,रोशनी साखरवाडे,आरोग्य सहायक देविदास मेश्राम,बंडू डावरे,उमेश भागडकर व गाव समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.