Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, फेब्रुवारी ०६, २०२१

भांडवलदारांना शेती व्यवसायात चंचू प्रवेश करू द्यायचा कट पंतप्रधानांनी रचलाय -जयंत पाटील

भांडवलदारांना शेती व्यवसायात चंचू प्रवेश करू द्यायचा कट पंतप्रधानांनी रचलाय -जयंत पाटील



वाशिम दि. ६ फेब्रुवारी - आज देशात परिस्थिती फार वाईट आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही... कामगारांचे कायदे मोडून काढले जात आहेत... भांडवलदारांना शेती व्यवसायात चंचू प्रवेश करून द्यायचा कट पंतप्रधानांनी रचला आहे असा आरोप करतानाच मोदींकडे पाहिले तर वाटतं राज्यकर्ते असे क्रुर कसे असू शकतात ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.


राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आज दहाव्या दिवशी वाशिम जिल्हयात असून यावेळी
वाशिम जिल्हयातील रिसोड विधानसभेचा आढावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला.


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्या मतदारसंघात निवडणूक लढवते, ज्या मतदारसंघात लढवत नाही अशा दोन्ही मतदारसंघाला राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त भेट देत असल्याचे सांगताना आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांचे नेटवर्क उभे करायचे आहे. सत्ता असो किंवा नसो आपल्या कार्यकर्त्यांचा जथा नेहमीच तयार पाहिजे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.



शेतकरी आंदोलन सुरू असताना दुसरीकडे मोदींनी पेट्रोल - डिझेलचे भाव वाढवले. चहूबाजूंनी जनतेला अडचणीत आणण्याचे काम केले जात आहे. परकीय लोक देशावर सत्ता गाजवत आहे असा भास होतो आहे असेही जयंत पाटील म्हणाले.


यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार अमोल मिटकरी, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विदर्भ दौरा समन्वयक प्रविण कुंटे पाटील, राजेंद्र बढिये आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.