अन्यायाविरुध्द संघर्षाची तयारी ठेवा - आ. किशोर जोरगेवार
शेकडोच्या संख्येत नकोडा येथील महिला व युवकांचा यंग चांदा ब्रिगेडमध्ये प्रवेश
चंद्रपूर : यंग चांदा ब्रिगेड ही २४ तास सामाजिक काम करणारी संघटना आहे. सामाजिक क्षेत्रात काम करत असतांना अनेक अडचणी येतील. काही प्रश्न निवेदनाने सुटतील तर काही प्रश्न संघर्षातुन सोडवावे लागतील त्यामूळे अन्याय करणा-या पेक्षा तो सहन करणारा अधिक गुन्हेगार असतो ही भावणा ठेवून अन्यायाविरोधात संघर्ष करण्याची तयारी ठेवा असे आवाहण आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
घूग्घुस - नकोडा येथील युवक व महिलांनी शेकडोच्या संख्येने आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत यंग चांदा ब्रिगेडमध्ये प्रवेश केला या प्रवेशासाठी नकोडा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवनियुक्त सदस्यांना संबोधीत करतांना ते बोलत होते.
यावेळी ग्राम पंचायत सदस्या ममता मोरे, सोनाली ऐंगलवार, अरुणा पटेल, माजी उपसरपंच हनिब मोहम्मद, शेख कासम, राजू तिरणकर, गणपत गेडाम, यंग चांदा ब्रिग्रेडचे नेते इमरान खान, माजी सैनिक नितीन मांदाडे, स्वप्नील वाढई, आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, घूग्घूस शहरात अनेक मोठे उद्योग आहेत. असे असले तरी येथील स्थानिक युवक रोजगारापासून वंचित राहिला आहे. त्यामूळे या उद्योगांमध्ये स्थानिकांनाच रोजगार मिळाला पाहिजे ही आपली भुमीका आहे. यासाठी विविध कंपणी व्यवस्थापनासोबत माझ्या बैठका सुरु आहेत. काही कंपण्यांनी ही गोष्ट मान्य केली आहे. मात्र ज्या कंपण्यांना उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार देणारा कायदा मान्य नाही तश्या कंपण्यांविरोधात लढा उभारावा लागणार असल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले. घूग्घूस शहराचा थांबलेला विकास पून्हा गतीशिल करण्याच्या दिशने माझे प्रयत्न सुरु असल्याचे यावेळी ते म्हणाले. यंग चांदा ब्रिगेडमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश सुरु आहे. मात्र हा प्रवेश लोकपयोगी आला पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. घुग्घुस येथे यंग चांदा ब्रिगेडचे संघटन विस्तारीत होत आहे. ही जेवढी आनंदाची गोष्ट आहे तेवढीच जबाबदारीचीही बाब असल्याचे ते यावेळी म्हणाले, यंग चांदा ब्रिगेडमध्ये प्रवेश घेतलेल्या नवनियुक्त सदस्यांच्या गळ्यात संघटनेचा दुपट्टा घालत आमदार किशोर जोरगेवार यांनी संघटनेत स्वागत केले.