Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, फेब्रुवारी ०६, २०२१

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन रविवारी मुंबईत, निमंत्रितांशी संवाद साधणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन रविवारी मुंबईत, निमंत्रितांशी संवाद साधणार


केंद्रीय अर्थसंकल्पावर महाराष्ट्रात पुढील आठवड्यात प्रदेश भाजपातर्फे प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार परिषदा व विशेष निमंत्रितांची संमेलने आयोजित करण्यात आली असल्याची माहिती भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी दिली.

एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री मा. निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे सर्वत्र स्वागत होत आहे. ह्या अर्थसंकल्पातील तरतुदी अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपाने देशभर एक विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमानुसार सांगितल्याप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रात पत्रकार परिषदा तसेच विशेष निमंत्रितांची संमेलने आयोजित करण्यात येत आहेत.

   या कार्यक्रमाच्या निमित्ताने दि. 7 फेब्रुवारी रोजी मुंबईत केंद्रीय अर्थमंत्री मा. निर्मला सीतारामन, दि. 6 फेब्रुवारी रोजी केंद्रीय रस्ते आणि भूपृष्ठवहन मंत्री मा. नितीन गडकरी हे वर्धा येथे तसेच पुण्यामध्ये केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री मा. प्रकाश जावडेकर, केंद्रीय ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा राज्यमंत्री मा. रावसाहेब पाटील दानवे तसेच विधानसभा विरोधी पक्षनेते मा.देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांत दादा पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते मा.प्रविण दरेकर, माजी मंत्री मा.सुधीर मुनगंटीवार, तसेच अन्य पदाधिकारी हे पत्रकार परिषदा तसेच विशेष संमेलने घेतील अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी दिली.

 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.