Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी ०४, २०२१

#mytadoba ताडोबा-अंधारी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानात कंत्राटी पदभरती



चंद्रपूर, दि.4 फेब्रुवारी :  ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर येथे 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर अकाऊंटन्ट कम टॅली ऑपरेटर व गेट मॅनेजर ची नेमणुक करावयाची आहे. अधिकची माहिती  www.mahaforest.gov.in आणि www.mytadoba.org या संकेतस्थळावर व प्रकल्पाच्या विविध कार्यालयामध्ये नोटिस  बोर्डावर तपशीलवारपणे दिली आहे.

इच्छुकांनी परिपूर्ण बायोडाटा आणि इतर कागदपत्रे कार्यकारी संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, मुल रोड,  चंद्रपूर-442401 दुरध्वनी क्रमांक 07172-251414 यांच्या कार्यालयास पोस्टाने /समक्ष/ई-मेल CCffdtadoba2@Mahaforest.gov.in यावर दिनांक 17 फेब्रुवारी 2021 रोजी संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत किंवा त्याआधी पाठवावे. प्राथमिक छाननीनंतर योग्य उमेदवारांना मुलाखतीची तारीख व वेळ दुरध्वनी संदेश /पत्र/ ई-मेल द्वारे कळविण्यात येईल, तसेच संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक यांनी कळविले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.