Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी ०४, २०२१

#Corona 10 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर


 

14 कोरोनामुक्त ; 10 पॉझिटिव्ह

Ø  आतापर्यंत 22,603 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 110

 

चंद्रपूर, दि. 4 फेब्रुवारी :  जिल्ह्यात मागील 24 तासात 14 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 10 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 23 हजार 105 झाली असून त्यापैकी बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 603 झाली आहे. सध्या 110 बाधितांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत दोन लाख दोन हजार 380 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 77 हजार 226 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

            जिल्ह्यात आतापर्यंत 392 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 354, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 15, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या दहा रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील तीन, बल्लारपूर एक, भद्रावती एक, ब्रम्हपुरी एक, मूल दोन व वरोरा येथील दोन रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.