भाजपा सडक अर्जुनी,अर्जुनी-मोर च्या वतीने महावितरण विरोधात टाळे ठोक आंदोलन.
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.5फेब्रुवारी:-
कोरोणा काळात आलेले अवाढव्य वीज बिल व सध्या सुरू असलेले वीज कनेक्शन कपातीचे धोरणाचा निषेध करून भारतीय जनता पार्टी तालुका सडकअर्जुनी,अर्जुनी मोरगाव च्या वतीने वीज वितरण कार्यालयावर आज दि.5फेब्रुवारी रोज शुक्रवारी माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचे नेतृत्वात हल्ला बोल आंदोलन करण्यात आले. सदर हल्लाबोल मोर्चा भाजपा तालुका कार्यालयातून निघून वीज वितरण कार्यालयावर नेण्यात आला.यावेळी वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता अमित शहारे यांना निवेदन सादर करण्यात आले.
वीज वितरण कंपनीने कोरोना काळातील घरगुती व कृषीपंपाचे वीज देयके मोठ्या प्रमाणात आकारले आहे. वीज बिल भरणा न करणाऱ्या ग्राहकांच्या वीज जोडण्या ( कनेक्शन कपात ) खंडित करण्याचा तत्संबंधी नोटीस बजावण्याचा सपाटा सुरू केला आहे. कोरोणा काळात जनतेला कोणतीही मिळकतीचे साधन नसल्याने विज बिल माफ करण्यात यावे. यासाठी भारतीय जनता पार्टीने अनेकदा वीज बिलांची होळी सुद्धा यापूर्वी केली आहे. आणि महाराष्ट्र शासनाने वीज बिल माफ करू असे आश्वासन सुद्धा दिले होते. तरीही वीज वितरण कंपनीने वीज देयके माफ न करता उलट भरमसाठ रकमेची देयके जनतेला देऊन थकीत बिलांचा भरणा करा अन्यथा वीज जोडण्या खंडित करू अशा नोटिसा राज्यात सर्वत्र देण्यात आले आहेत. व काही वीज जोडण्या खंडीत करण्याचा कंपनीने सपाटा लावला आहे. हा सर्व प्रकार तात्काळ थांबविण्यात यावा. अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली. वीज कंपनीच्या या प्रकारा विरोधात भारतीय जनता पार्टीने राज्यव्यापी आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपा तालुका अर्जुनी-मोर च्या वतीने वीज वितरण च्या उपविभागीय कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन मोर्चाद्वारे करून उपविभागीय अभियंता अमित शहारे यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी आंदोलनात प्रदेश सदस्य सौ.रचनाताई गहाणे,जिल्हा महामंत्री श्री.लायकराम भेंडारकर,तालुकाध्यक्ष श्री.अरविंद शिवणकर,श्री. लक्ष्मीकांत धानगाये,जिल्हा सचिव श्री.शेषराव गिर्हेपुजे,डाॅ.पटले,जे.डी.जगणित,
रघुनाथ लांजेवार,गजानन डोंगरवार,केवळराम पाटील पुस्तोडे,बबन कांबळे,गिरधारी हत्तीमारे,राजेश कठाणे,परमानंद बडोले,शिशिर येळे,नुतन सोनवाने,विजया कापगते,मंजुषा तरोणे,पदमा परतेकी,कविता रंगारी,माधुरी पाथोडे,मंदा कुंभरे,तेजुकला गहाणे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.