भाजप कॉंग्रेस इतर पक्षातुन मोठ्याप्रमाणात पक्ष प्रवेश
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी परिवार संवाद
खापरखेडा : राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेची सुरुवात केली पाचव्या दिवशी परिवार संवाद कार्यक्रम सावनेर विधानसभा क्षेत्रातील खापरखेडा येथे येथील दया यशवंत लॉन येथे संपन्न झाला यावेळी येथे कॉंग्रेस चे आमदार आहेत तुम्हाला सोबत घेवून काम करतात की नाही आपल्या कार्यकर्त्यांवर अन्यायतर होत नाही अशी विचारणा कार्यकर्त्यांना केली
महाविकास आघातील मित्रपक्ष कॉंग्रेस चे व राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार सावनेर विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतात आमदाराकडून आपल्या कार्यकर्त्यावर अन्यातर होत नाही अशी विचारणासुध्दा जयंत पाटील यांनी केली यावेळी सावनेर विधानसभा क्षेत्रातील बूथ परिस्थिती व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकारणी बदल सखोल चर्चा केली राष्टवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना जोमानेकामाला लागण्याचे आव्हान केले.यावेळी झालेल्या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, माजीमंत्री रमेश बंग , माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार प्रकाश गजभिये नागपुर जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख , विदर्भ दौरा समन्वयक प्रवीण कुटे पाटील , महिला प्रदेशाअध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवतीप्रदेशा अध्यक्षा सुनिल गव्हाणे पक्षाचे इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सावनेर विधानसभा राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष किशोर चौधरी जिल्हा उपाध्यक्ष अमर जैन यांच्या नेतृत्वात जवळपास पाचशे कार्यकर्त्यांनी राष्टवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी भारतीय जनता पार्टी सावनेर तालुका अध्यक्ष अनुसूचित मोर्चा रवि फुलझेले , लीलाधर एकरे , वासुदेव काकडे , रतन काळे, प्रभाकर आसोले, ज्ञानेश्वर आसोले, संतोष राजभर, सतेंद्र यादव, जावेद अन्सारी , पवन वानखेडे विनोद कोथरे, सुनिता भास्कर भलावी, अजय रामटेके,पियुष भलावी, आदि इतर पक्षातून मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश करण्यात आला
कार्यक्रमाच्या सफलतार्थ उपसरपंच दहेगाव रंगारी ,रामु बसुले, कपिल वानखेडे, देवानंद मगरे, अफसर खान, सूरज गौतम, विनोद गोडबोले ,कविता माटे, जितेंद्र पानतावणे, नाना केने, राजेश बावणे, सुनिता उईके, दिनेश इंगोले अतुल पाटील