गोंदिया जिल्हा पोलीस दलाचा अभिनंदनीय उपक्रम
पोलीस ठाणे नवेगावबांध येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि. 19 फेब्रुवारी:- पोलिस अधिक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस स्टेशन नवेगावबांध येथे दिनांक 17 फेब्रुवारी रोज बुधवारला परिसरातील बेरोजगार युवक व युवतीं करिता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्या करिता नागपूर, पुणे आणि औरंगाबाद येथील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यांनी उमेदवारांचे मुलाखती घेऊन त्यांना पुढील प्रक्रियेकरिता विविध तारखा देऊन आप आपल्या कंपन्यामध्ये बोलावले आहे. या रोजगार मेळाव्यात पोलीस स्टेशन नवेगावबांध परिसरातील 10 वी 12 वी पास, ITI, पदवीधर असे जवळपास 120 मुले, मुली सहभागी होऊन या रोजगार मेळाव्याचा लाभ घेतला. _याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक अशफाक शेख यांनी केले तर पोलीस स्टेशन नवेगावबांध चे ठाणेदार जनार्दन हेगडकर यांनी अध्यक्षीय भाषणात मुलांना मार्गदर्शन केले. हा रोजगार मेळावा यशस्वी करण्याकरिता पोलीस स्टेशन नवेगावबांध चे ठाणेदार जनार्दन हेगडकर व पोलीस उपनिरीक्षक अशफाक शेख तसेच सर्व स्टाफ ने परिश्रम घेतले.सदरचा रोजगार मेळावा हा मास्क तसेच सोशल डिस्टन्सिंग चे पालन करून पार पाडण्यात आला.मेळाव्याला परिसरातील सुशिक्षित बेरोजगार बहुसंख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचे या परिसरात पोलिस दलाचे कौतुक होत आहे.