महिला नामक शक्तीकेंद्र अधिक शक्तीशाली व्हावे – आ. सुधीर मुनगंटीवार
भाजपा महिला मोर्चातर्फे चंद्रपूरात तेजस्विनी महिला जागर सम्मेलन
भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत कोणत्याही सरकारने महिलांसाठी जेवढे केले नाही त्यापेक्षा कितीतरी हितकारक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले आहेत. आज राज्यात महिला असुरक्षीत आहेत. सहा महिन्याच्या मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटना घडत आहेत. महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यात राज्य सरकार अयशस्वी ठरले आहे. या संदर्भातल्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही हे चित्र अतिशय दुर्देवी आहे. मुलगा आणि मुलगी एकसमान आहे ही भावना प्रत्येक स्त्री ने जपावी, असे आवाहन भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्र वाघ यांनी केले. तेजस्विनींचा हा जागर शक्तीदायी ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
भारतमाता या शब्दातच माता आहे. स्त्री ही जननी आहे. तो एक सूर आहे, विचार आहे, शक्तीकेंद्र आहे. हे शक्तीकेंद्र अधिक शक्तीशाली व्हावे यासाठी प्रयत्नांची शर्थ करा, असे आवाहन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख व माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक ७ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर येथील जैन भवन येथे भाजपा महिला मोर्चा चंद्रपूर महानगर शाखेतर्फे आयोजित मकर संक्रांती उत्सव तसेच तेजस्विनी महिला जागर सम्मेलनात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सौ. चित्रा वाघ, भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र सरचिटणीस सौ. अश्विनी जिचकार, प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा सौ. वनिता कानडे, महापौर सौ. राखी कंचर्लावार, महानगर महिला मोर्चा अध्यक्षा तथा माजी महापौर सौ. अंजली घोटेकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी पारंपरीक वेषातील लहान मुलींनी दिपप्रज्वलन केले.
यावेळी बोलताना महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस सौ. अश्विनी जिचकार म्हणाल्या, भारतीय जनता पार्टीचे संघटन बळकट करण्यासाठी महिलांनी सक्रीय योगदान देण्याची आवश्यकता आहे. आजवरची प्रत्येक क्रांती महिला शक्तीमुळे यशस्वी झाली आहे. महिला शक्ती हे भारतीय संस्कृतीचे बलस्थान आहे असेही अश्विनी जिचकार यावेळी बोलताना म्हणाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. अंजली घोटेकर यांनी केले. राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार असताना महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. केंद्रातील मोदी सरकारने सुध्दा महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. या योजना महिलांपर्यंत पोहचवत त्या माध्यमातुन भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक बळकट करण्यावर भर देण्याचे आवाहन सौ. अंजली घोटेकर यांनी केले.
यावेळी हळदीकुंकु कार्यक्रम संपन्न झाला, महिलांना वाण वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन एकता पित्तुलवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महामंत्री सौ. शिला चव्हाण, सौ. सपना नामपल्लीवार, सौ. प्रज्ञा गंधेवार, सौ. चंद्रकला सोयाम, सौ. लिलावती रविदास, सौ. किरण भडके, सौ. मंजूश्री कासनगोट्टूवार, सौ. विशाखा राजुरकर, सौ. किरण बुटले, कु. मोनिषा महातव, सौ. वंदना राधारपवार, सौ. सिंधु राजगुरे, सौ. रेणुका घोडेस्वार, सौ. शुभांगी दिकोंडवार, सौ. रमिता यादव, सौ. सुधा सहारे, सौ. स्मिता रेभनकर, सौ. कविता जाधव, श्रीमती पुनम गरडवा, सौ. सिमा बनकर, सौ. शोभा यादव, सौ. रंजना उमाटे, सौ. निशा समाजपती, सौ. सुलोचना कुळसंगे, सौ. उषा मेश्राम, सौ. सुमित्र बोबडे, सौ. सुनंदा भेदोरकर, सौ. सायरा सैय्यद बानो, आदींनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महिलांची मोठया संख्येने उपस्थिती होती.