पश्चिम बंगालमध्ये परिवर्तनाचे वारे, मतदार सर्वेमध्ये भाजपची आघाडी ; व्होट शेअर 41.6 टक्के
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर अटळ असल्याचे संकेत मिळत आहे. टाइम्स नाऊने केलेल्या एका मतदारांच्या सर्वेमध्ये ही बाब उघड झाली आहे.राज्यात भाजपने सोनार बांगला आणि परिवर्तन रॅली काढून वातावरण निर्मिती केली असून राजकीय क्षेत्र ढवळून काढले आहे.
त्याचे सकारात्मक परिणाम मतदारांमध्ये होत आहेत. निवडणुकीचे घोडेमैदान दूर असले तरी मतदारांचा कल भाजपकडे झुकत चालला असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
राज्यात निवडणुका झाल्यास मतदारांचा कल कोणत्या पक्षाकडे अधिक असेल, याची चाचपणी सर्वेमध्ये केली. त्याचे निष्कर्ष भाजपच्या बाजूने असल्याचे स्पष्ट होत आहे.
भाजपला 41.6 टक्के मते पडतील.
त्या पाठोपाठ तृणमूल काँग्रेसला 39.6 टक्के, काँगेसला 8.3 टक्के तर डाव्या पक्षांना 4.4 टक्के मते पडतील.इतर पक्षांना 2.3 ,टक्के मते मिळतील, असे म्हंटले आहे.
भाजपच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी ही माहिती ट्विट करून दिली आहे.