Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जानेवारी १३, २०२१

वडेट्टीवारविरुद्धची भांगडीयाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

वडेट्टीवारविरुद्धची भांगडीयाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली


नागपूर : मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल व्हावा याकरिता माजी आमदार मितेश भांगडीया यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी फेटाळून लावली.
न्यायमूर्ती सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांनी हा निर्णय दिला. पासपोर्ट विभागाला प्रकरणाची चौकशी करू द्या. त्यानंतर एफआयआर दाखल न झाल्यास याचिकाकर्त्याला न्यायालयात येता येईल. चौकशीपूर्वीच एफआयआर दाखल करण्याचा आदेश देता येणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले. भांगडिया यांनी केलेल्या याचिकेत विजय वडेट्टीवारयांनी आपल्यावर असणाऱ्या गुन्हे;लपवल्याचा आरोप केला होता. भांगडिया यांनी अनेक वेळा मुख्यमंत्र्यांपासून ते पासपोर्ट ऑफिसपर्यंत तक्रार केली होती. त्यावर;कारवाई झाली नाही म्हणून ते शेवटी हायकोर्टात गेले. अधिक माहितीनुसार विजय वडेट्टीवार यांनी पासपोर्टसाठी मनोरा हा कायमचा पत्ता (पर्मनंट ऍड्रेस);दिला होता. तेथील;पोलीस ठाण्यामधून एनओसी घेतली होती. त्यात त्यांच्यावर कुठेही केसेस सुरू नाहीत असे नमूद होते. त्यामुळे;भांगडिया हायकोर्टात गेले. त्यावेळी हायकोर्टाने पासपोर्ट ऑफिसला पाठवण्यासाठी;नोटीस काढली. त्यानंतर पासपोर्ट कार्यालयाने विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त केला असल्याची चर्चा सुरु होती.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.