Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जानेवारी १६, २०२१

पोस्टल एम्प्लाइज चे संयुक्त द्विवार्षिक खुले अधिवेशन उद्या भंडाऱ्यात

पोस्टल एम्प्लाइज चे संयुक्त द्विवार्षिक खुले अधिवेशन उद्या भंडाऱ्यात



संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.16 जानेवारी:-
नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लाइज group-c, नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लाइज पोस्टमन व एमटीएस ग्रुप सी ,नॅशनल युनियन ऑफ ग्रामीण डाक सेवक नागपूर ग्रामीण विभाग नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 17 जानेवारीला सकाळी 11 वाजता मुस्लिम लायब्ररी सभाग्रह भंडारा येथे हे संयुक्त द्विवार्षिक खुले अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.
अधिवेशनाचे उद्घाटन नागपूर महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेता तथा महाराष्ट्र इंटकचे उपाध्यक्ष तानाजी वनवे यांच्या शुभहस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय अध्यक्ष एनएपीई 3 एस. आय. वाघमारे प्रमुख अतिथी म्हणून जी. एन. रहाटे, निशार मुजावर, आर.एच. गुप्ता, सुनील झुंजारराव, संतोष लाड, मिलिंद निपाणकर, अशोक ढोले जयराम पगार, आर. टी. गोंडाणे, ए.पी. पांडे ,धनंजय राऊत, आर. जी. खंदाडे, डी. एम. मेश्राम ,डी. एल. डोंगरे ,इक्बाल शेख उपस्थित राहणार आहेत. तरीपण या द्विवार्षिक खुल्या अधिवेशनाला सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे.असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष गजेंद्र लोथे यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.