समाजकार्य महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी
कामठी : येथील समाजकार्य महाविद्यालयात भारतरत्न नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रुबीना अंसारी होत्या तर प्रमुख वक्ते म्हणून मराठी विभागप्रमुख डॉ.राष्ट्रपाल मेश्राम उपस्थित होते.
सर्वप्रथम नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यानंतर डॉ. राष्ट्रपाल मेश्राम यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्य आणि कर्तृत्वावर विस्तृत प्रकाश टाकला. त्यांचे १२५ वे जयंती वर्ष पराक्रम दिवस म्हणून साजरा करताना त्यांच्या गौरवशाली स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास श्रोत्यांना अवगत करून दिला.अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्या डॉ.रुबीना अन्सारी म्हणाल्या, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. ते भारतातील एकमेव महापुरुष आहेत ज्यांना लोक नेताजी म्हणून संबोधतात. केवळ शब्दांनी क्रांती घडून येत नाही ; क्रांतीसाठी प्रत्यक्ष कृती केली पाहिजे, हा मौलिक संदेश त्यांच्या जीवनकार्यातून आपणांस मिळतो असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. सविता चिवंडे यांनी केले. या प्रसंगी डॉ.प्रणाली पाटील, प्रा. उज्ज्वला सुखदेवे, डॉ. ओमप्रकाश कश्यप, डॉ. मनोज होले, प्रा. निशांत माटे, प्रा.शशिकांत डांगे, ग्रंथालय सहाय्यक उज्ज्वला मेश्राम, गजानन कारमोरे, वसंता तांबडे, शशील बोरकर उपस्थित होते.