औरंगाबाद शहराला छत्रपती संभाजी नगर नाव देण्याकरिता मनसेचे आंदोलन
नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नागपूर शहराचा वतीने आक्रमक भूमिका घेत नागपूर शहराचे अध्यक्ष श्री. विशाल बडगे यांच्या नेतृत्वात राज्यातील औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करा या मागणीसाठी नागपूर शहरातील गणेशपेठ बस स्टॅन्ड येथे औरंगाबाद ला जाणाऱ्या एस टी बसला औरंगाबाद या नावावर छत्रपती संभाजीनगर असे फलक लावून ''छत्रपती संभाजी महाराज कि जय''अश्या घोषणा देण्यात आल्या.अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या या प्रश्नांवर राज्य सरकार वेळ काढूपणा करत आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव औरंगाबाद शहराला दिले गेले नाही तर यापुढे अतिशय तीव्र असे आंदोलन पक्षाचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांचा आदेशानुसार नागपुर शहराचा वतीने करण्यात येईल असा ईशारा सरकारला देण्यात आला.दरम्यान गणेशपेठ पोलीस स्टेशन येथिल पोलिस अधिकारी यांनी शहर अध्यक्ष विशाल बडगे, शहर सचिव घनश्याम निखाडे, मध्य नागपूर अध्यक्ष शशांक गिरडे, पूर्व नागपूर अध्यक्ष उमेश उत्तखेडे, दक्षिण नागपूर उपाध्यक्ष लोकेश कामडी, महाराष्ट्र सैनिक अचलाताई मेसन यांना अटक केली.या आंदोलनात उपशहर अध्यक्ष आशिष पांढरे, जिल्हा सचिव मनोज गुप्ता, दक्षिण विभाग अध्यक्ष पिंटु बिसेन, मध्य नागपूर उपाध्यक्ष अण्णा गजभिये, राजू पत्राळे, सचिव सुमित वानखेडे, पूर्व नागपूर उपाध्यक्ष राहुल वंजारी, पवन शाहू, अजय मारोडे,प्रभाग अध्यक्ष शुभम तिजारे,गौरव मुलमुले,शंतनू तिजारे, प्रज्वल देशमुख, ओंकार चन्ने, अश्विन शेंडे, लेखराज पराते, नितीन टाकळीकर, नितीन बोभाटे, निकेश अतकरी , रजा खान तसेच असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.