Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जानेवारी २५, २०२१

उमेद अभियानाच्या वतीने 3 हिराई मार्ट उदघाटन चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह़मपुरी येथे आयोजन

उमेद अभियानाच्या वतीने 3 हिराई मार्ट उदघाटन

चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह़मपुरी येथे आयोजन



चंद्रपूर : ग्रामीण भागातील स्वयंसहायता समुहांच्या महिलांना रोजगार मिळावा तसेच स्थानिक उत्पादकांना बाजारपेठ मिळावी, यासाठी जिल्हयात 'हिराई रुरल मार्ट' आणि 'घरकुल मार्ट' उभारण्याचे काम उमेद अभियानाच्या माध्यमातून सुरु असून, 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर मुख्यालय, बल्लारपूर, ब्रम्हपूरी येथे मार्टचे उदघाटन होणार आहे. चंद्रपूर येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे उदघाटन जि.प. अध्यक्ष संध्याताई गुरनुले करणार आहेत.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अंतर्गत जिल्हयात सुमारे 18 हजार स्वयंसहायता समुह कार्यरत आहे. अभियानाने दिलेल्या प्रशिक्षणामुळे समुह पुरक व्यवसायासह अनेक छोटया उदयोगांकडे वळले आहेत. यात स्थानिक स्तरावरील संसाधने वापरुन खाद्य श्रेणीतील पदार्थ, शोभीवंत वस्तु आदी तयार केल्या जात आहेत. या उत्पादनांना उमेद अभियानाकडून 'हिराई' या नावाने बाजारात आणले जात आहे.

सध्या या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी जिल्हा अभियान संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून प्रयत्न सुरु आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून जिल्हा तसेच तालुकास्तरावर 'हिराई रुरल मार्ट' सुरु केले जात आहेत. जिल्हा मुख्यालयी जिल्हा परिषद प्रशासकीय परिसरात 'हिराई रुरल मार्ट' तयार करण्यात आले असून, 26 जानेवारीचे औचित्य साधुन जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले या मार्टचे उदघाटन करणार आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राहुल कर्डिले, जिल्हा सहसंचालक शंकर किरवे उपस्थित राहणार आहे. याच दिवशी दरम्यान ब्रम्हपूरी पंचायत समिती परिसरातही मार्टचे उदघाटन होणार आहे.

            जिल्हयात सुरु असलेल्या घरकुल योजनेतील लाभार्थींना सवलतीत साहित्य मिळावे यासाठी घरकुल मार्टची संकल्पना राबविण्यात येत असून आतापर्यंत 4 घरकुल मार्ट कार्यान्वीत झाले आहेत. 26 जानेवारीचे औचित्य साधुन बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे येथे घरकुल मार्टचे उदघाटन करण्यात येणार आहे. विविध मार्टमधील साहित्य खरेदी करुन ग्रामीण भागातील महिलांचा उत्साह वाढवावा, अशी विंनती  जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन ताजने यांनी केले आहे.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.