प्रयोगशील शिक्षक खुशाल डोंगरवार यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी निवड
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.13 जानेवारी:-
येथील रहिवाशी प्रयोगशील शिक्षक खुशाल डोंगरवार यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. निवडराज्य शैक्षणिक संशोधन व शैक्षणिक परिषद पुणेच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन केले जाते. यासाठी राज्यभरातील सर्व जिल्ह्यातील शिक्षकांकडून नवोपक्रमाचे प्रस्ताव मागितले जातात.प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक या गटात प्रथम फेरीतून निवड झालेल्या आणि द्वितीय फेरीसाठी पात्र ठरलेल्या नवोपक्रमशील शिक्षकांचे मूल्यमापन आभासी मुलाखत घेऊन करण्यात आले. यात लाखांदूर तालुक्यातील पंचशील प्राथमिक शाळा पिंपळगाव कोहळी येथील सहायक शिक्षक खुशाल किसन डोंगरवार यांच्या "उपक्रमांतून पर्यावरण विकास" या नवोपक्रमास भंडारा जिल्ह्यात चतुर्थ क्रमांक प्राप्त झाला असून, त्यांचा नवोपक्रम राज्यस्तरीय फेरीसाठी पात्र ठरला आहे.सदर नवोपक्रमांचे जिल्ह्यास्तरीय फेरीतील मूल्यमापन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था भंडाराच्या अधिव्याख्याता कल्पना बानकर ,रहांगडाले अध्यापक विद्यालय सेंदूरवाफाचे प्राचार्य रामदास भुतेकर सर, प्रियदर्शनी अध्यापक विद्यालयच्या प्राचार्या आम्रपाली भिवगडे यांनी केले.यासाठी डॉ. रवींद्र जनबंधु सर यांनी सहकार्य केले.
खुशाल डोंगरवार यांच्या निवडीबद्दल संस्थेचे सचिव जयदेवजी मेश्राम, शिक्षणाधिकारी बारस्कर साहेब, शा. पो.आ.अधीक्षक रवींद्रजी सलामे साहेब, लाखांदूरचे गटशिक्षणाधिकारी तत्वराजजी अंबादे साहेब,डाएटच्या प्राचार्या राधा अतकरी, डाएटचे अधिव्याख्याता गुलाबरावजी राठोड, केंद्रप्रमुख रवींद्र शिवहरकर, किशोर शहारे, भालचंद्र चुटे,कु अनुराधा रंगारी आणि समस्त शिक्षक मित्रांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.खुशाल डोंगरवार यांनी आपल्या यशाचे श्रेय हेमराजजी कापगते उपाध्यक्ष शा.व्य.स., तथा समस्त पदधिकारी शा.व्य.स.,
समस्त पदधिकारी माता पालक संघ, समस्त पदधिकारी पालक शिक्षक संघ, समस्त पदाधिकारी ग्रामपंचायत पिंपळगाव कोहळी, विनोदजी शहारे, चंपाबाई बागडे, शेवंताबाई शहारे, समस्त पालकवर्ग,आणि पिंपळगाव कोहळी येथील समस्त गावकरी आणि आपल्या कुटुंबिय यांना दिले आहे.