जयदुर्गा विद्यालय गौरनगर येथे रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.23 जानेवारी:-
दरवर्षी घडणाऱ्या दुर्घटनांकडे बघता ७०% दुर्घटना ह्या रस्ते वहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यानेच होतात. त्यामुळे विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये रस्ते सुरक्षा संबंधी जाणीव जागृति व्हावी. या उद्देशाने श्री. गणेश बहुउद्देशीय संस्था अर्जुनी/मोर द्वारा संचालित जयदुर्गा हाय. एव ज्यु. कॉलेज गौरनगर येथे रस्ते सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक १८ जानेवारी ते २३ जानेवारी दरम्यान आयोजित रस्ते सुरक्षा अभियान अंतर्गत 'जियो और जीने दो,' 'जान है तो जहान है,' या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांमधे वाहतुकीसंबंधी नियम यांच्ये ज्ञान व्हावे म्हणून रस्ते सुरक्षा संबंधी प्रश्न माला तयार करून ,यावर प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली.
'रस्ते सुरक्षा से दोस्ती तोड़ोगे तो एक दिन दुनिया छोड़ोगे,' 'वाहन धीरे चलाए अपना कीमती जीवन बचाए' अशाप्रकारे संदेश देनेरे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी रसत्याच्या दुतर्फा उभे राहून वहनचालकांमधे जागृति निर्माण करुण रस्ते सुरक्षासंबंधी नियमान्चे पालन करण्याचे आह्वाहन केले.
तसेच नियमंकडे दुर्लक्ष केल्याने, होणारे दुष्परिणाम दर्शविन्याकरिता 'यातायात एवम हम' या विषावर पोस्टर स्पर्धा घेण्यात आली.
संस्था सचिव डॉ. राजेश चांडक व विद्यालयाचे प्राचार्य सुनीलकुमार पाउलझगड़े यांच्या पुढाकाराणे आयोजित रस्ते सुरक्षा सप्ताहमध्ये अभियान प्रमुख सहायक शिक्षक कांतिकुमार बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोशनी हालदार, शर्मिला मल्लिक, ईशा सरकार, प्राची राउत, धनुश्री मिसार, साधना बिस्वास, किरण मल्लिक, तापसी सरकार, हरेकृष्ण मल्लिक, आकाश सरकार, किशोर सरकार, जितेश बारई, रजनीकांत सरकार, पराग मिसार, प्रणय फुले इत्यादि विद्यार्थयानी विविध स्पर्धांमध्ये हिरीरिने सहभाग घेतला.