पोलीस-आर्मी भरती पूर्व प्रशिक्षण शिबिराच्या नोंदणीला युवकांचा उत्सुर्फ प्रतिसाद
जनविकास सेनेतर्फे 16 जानेवारी ते 19 फेब्रुवारी पर्यंत मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
चंद्रपूर : जनविकास सेनेच्या स्थापना दिनानिमित्त तसेच राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे जयंतीचे औचित्य साधून दिनांक १२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता चांदा कल्ब ग्राउंड चंद्रपूर येथे पोलिस-आर्मी भरती पूर्व प्रशिक्षण शिबिराची नोंदणी सुरू करण्यात आली.जन विकास सेनेतर्फे 16 जानेवारी ते 19 फेब्रुवारी २०२१ पर्यंत या मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.चांदा क्लब ग्राउंड येथे दररोज सायंकाळी ४ ते ६ वाजे दरम्यान प्रसिद्ध फिजिकल ट्रेनर रोशन भुजाडे यांच्या मार्गदर्शनात युवक व युवतींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.कस्तुरबा रोड ज्युबिली शाळे जवळील वासनिक सर अकॅडमी येथे लेखी परीक्षेचे मार्गदर्शन तज्ञां मार्फत देण्यात येणार आहे. 12 जानेवारी ते 15 जानेवारी पर्यंत या मोफत शिबिरा करिता ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात येणार आहे.चांदा क्लब ग्राउंड येथे सकाळी सात वाजता रीतसर उद्घाटन करून नोंदणीला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख,उद्घाटक म्हणून प्रसिद्ध फिजिकल ट्रेनर रोशन भुजाडे तसेच प्रमुख अतिथी म्हणून जिम ट्रेनर महेश सामनपल्लीवार, दिनेश सामनपल्लीवार,श्री स्पोर्टस् चे संचालक संदीप वाढई,स्केटींग कोच प्रवीण चवरे, जन विकास सेनेच्या मनीषा बोबडे निर्मला नगराळे उपस्थित होते.
शेकडो युवक- युवतींनी नोंदणी करून या कार्यक्रमाला उत्सुर्फ प्रतिसाद दिला. यावेळी बोलताना पप्पू देशमुख यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या मोफत प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेण्याकरिता ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी करण्याचे आवाहन केले.
स्थापना दिनानिमित्त आयोजित नोंदणी शिबिराच्या यशस्वीतेसाठी जन विकास सेनेचे इमदाद शेख, प्रफुल बैरम,गोलू दखणे,आकाश लोडे, गितेश शेंडे, राहुल दडमल अक्षय येरगुडे,नामदेव पिपरे,सतीश येसांबरे,अमोल घोडमारे,दिनेश कंपू, देवराव हटवार,भाग्यश्री मुधोळकर, बबिता लोडेल्लीवार, सुनयना क्षीरसागर, ज्योती कांबळे,नीलिमा वनकर, हेमा देशपांडे, रिता रोहणकर, गीता दहीवलकर, निशा हनुमंते, दर्शना झाडे,अर्चना लाकडे,सुषमा शेलोकार, अर्चना वनकर इत्यादींनी अथक प्रयत्न केले.
ऑफलाईन नोंदणी करिता अक्षय येरगुडे जन संपर्क कार्यालय,पुर्ती बाजार जवळ, नानाजी नगर, नागपूर रोड,चंद्रपूर,वासनिक सर अॅकडॅमी (कस्तुरबा रोड,ज्युबिली शाळेजवळील गव्हर्मेंट लायब्ररी मागे तसेच श्री.स्पोर्टस् (झाडे काॅम्प्लेक्स,संत कंवरराम चौक,रामनगर,चंद्रपूर) येथे फार्म उपलब्ध आहेत.
ऑनलाईन (व्हाट्सअप) नोंदणी करिता 7798174435 ,9975901200,9561056002, 7875091632,9975298044,
9730556447,9503683525,9579014433,9049244567 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.