Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जानेवारी २३, २०२१

२६ जानेवारीपासून सावलीत पालकमंत्री चषकक्रिकेट व कबड्डी स्पर्धेचे आयोजन

२६ जानेवारीपासून सावलीत पालकमंत्री चषकक्रिकेट व कबड्डी स्पर्धेचे आयोजन

सावली : तालुका कला व क्रीडा युवा महोत्सवाच्या वतीने सावली येथील योगी नारायण धाम परिसर येथे पालकमंत्री चषक आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात भव्य रबरी बॉल क्रिकेट व कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन मंगळवार दि. २६ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडणार आहे. अध्यक्षस्थानी प्रदेश युवक कॉंग्रेसच्या सरचिटणीस शिवाणी वडेट्टीवार तर प्रमुख पाहुणे म्हणून कॅाग्रेस कमिटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, ॲड. राम मेश्राम, शांताई फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल नाडेमवार, साईराम शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रोहीत बोम्मावार, शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय मुत्यलवार, माजी नगरसेवक संदीप पुण्यपकार, युवा नेते निखील सुरमवार, युवा नेते संकेत बल्लमवार आदी उपस्थित राहणार आहे. क्रिकेट स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ५५,५५५, द्वितीय ३३,३३३, तृतीय २२,२२२, महिला कबड्डी स्पर्धेचे प्रथम पारितोषिक २१,१११, द्वितीय १५,५५५, पुरुष कबड्डी स्पर्धेचे प्रथम १०,५५५, द्वितीय ७,५५५ रुपये तसेच प्रत्येक बक्षिसासाह शिल्ड देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अंतबो बोरकर (८३२९३११११९) प्रफुल्ल बोरकर (९०२१२३५९०९) यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रसिद्धीपत्रकातून कळविले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.