चंद्रपूर : एलिवेट फिल्मस् आणि लावण्याप्रिया आर्टस् ह्यांच्या संयुक्त विद्यमाने 'पल्याड' या मराठी सिनेमाच्या मुहूर्त नुकताच चंद्रपूर येथे पार पडला. पल्याड चित्रपटाचं शूटिंग चंद्रपुर जिल्हयातील सिंदेवाही मधील, मरेगांव, कुकडहेटी, चिकमारा, शिवनी, राजोली घोट या ग्रामिण भागात पार पडणार आहे. लॉकडाऊनच्या प्रचंड त्रासा नतंर चंद्रपुर जिल्हयातील नागरीकांच्या जखमेवर फुंकर मारायच कार्य निर्माता पवन सादमवार सुरज सादमवार आणि शैलेश दुपारे यांनी केलय. पल्याड चित्रपट हा सामाजिक विषयाला भाष्य करणार्या एका परिवारात घडलेल्या काही कडू-गोड गोष्टीवर आधारीत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन चद्रपुर शहरातील शैलेश दुपारे यांचे आहे तर चित्रपटाची कथा लेखक सुदर्शन खडांगळे यांनी लिहीलीय. तसेच चित्रपटातील उत्कृष्ठ आणि प्रेक्षकांना खिळून ठेवणारी पटकथा - संवाद लेखक दिग्दर्शक सुदर्शन खडांगळे व दिग्दर्शक शेलेश दुपारे यानी लिहीलीय. या चित्रपटा मध्ये २५ लोंकाची टेक्निकल टीम अहोरात्र काम करीत असुन सगळे मिळून ८५ लोंक ह्या चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटात नॅशनल फिल्म अँवार्ड विजेते शंशाक शेंडे, नाळ चित्रपटातील चैत्याच्या आई ची भुमिका साकारलेल्या अभिनेत्री देविका दफतरदार, माझ्या नवऱ्याची बायकोतील देवेद्र दोडके, कोर्ट चित्रपटातले विरा साथीदार, सायली देठे, गजेश कांबळे, महेश घाग आणि चंद्रपुर जिल्हातील बल्लारपुरच्या नवोदित बालकलाकार रौचित निनावे याला संधी देण्यात आला आहे. चित्रपटात २ गाणी असून चित्रपटाची गाणी अरुण सागोंळे व प्रंशात मडपुवार यांची असून संगीत जगदीश गोमिला व अश्विन तुरकर ह्यांनी दिलंय. चित्रपटाच आर्ट डायरेक्शन चंद्रपुर जिल्हयातील गडचांदूर स्थित शॉटफिल्म मेंकर अनिकेत परसावर हे आहेत. वीस दिवसांच शूटिंग २५ जानेवारी २०२० पासुन सुरु होत आहे. चित्रपटाच्या माध्यमातुन मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सातारा, नांदेड, नागपुर, अहमदनगर, शिर्डी ह्या भागातील कलाकार आणि टेक्निशीयन ऐकत्र येऊन एका दर्जेदार चित्रपट बनवण्याचा मनसोबा पल्याड टीम चा आहे असे दिग्दर्शक शेलेश दुपारे बोलताना सागत होते.
पल्याड' या मराठी सिनेमाची शूटिंग २५ जानेवारी पासून सिंदेवाही परिसरात
पल्याड' या मराठी सिनेमाची शूटिंग २५ जानेवारी पासून सिंदेवाही परिसरात