आय.एम.ए चंद्रपुरची वार्षिक सिमेकॉन परिषदेला सुरुवात
आभासी परिषदेच्या माध्यमातून ७८० डॉक्टर नोंदविणार सहभाग
चंद्रपूर :इंडियन मेडिकल अससोसिएशनची वार्षिक सिमेकॉन परिषद आजपासून सुरु झालेली आहे सिमेकॉन नावाची ही परिषद गेल्या ७ वर्षापासून सतत सुरु आहे ही आतापर्यंतची ८ वी परिषद असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतः उपस्थित न राहुंन आभासी (व्हर्च्युअल)परिषदेचे आयोजन केलेले आहे महाराष्ट्र मेडिकल काउंसिलने मान्यता दिलेल्या ७८० सदस्यांनी नोंदणी केलेली आहे या वार्षिक परिषदेंचे उद्धघाटन आज दि.१५ जानेवारी २०२१ ला इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अनिल माडूरवार, सचिव डॉ.सुरभी मेहरा, प्रेसिडेंट इलेक्ट महाराष्ट्र मेडिकल कोन्सिल निरीक्षक डॉ.मंगेश गुलवाडे यांचे प्रमुख उपस्थितीत सीमेकॉन वार्षिक परिषदेचे उदघाटन संपन्न झाले डॉ.कल्पना गुलवाडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तसेच डॉ.अभिषेक दिक्षित ,सचिव डॉ.अनूप पालीवाल,डॉ.सुधिर रेगुंडवार, डॉ.पल्लवी इंगळे, डॉ.प्राजक्ता असवार, डॉ.अभय राठोड, डॉ.अमित देवईकर, डॉ.अजय दुद्दलवार, डॉ.नरेंद्र कोलते,डॉ.प्रेरणा कोलते यांच्या विशेष सहकार्याने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे या वार्षिक परिषदें मध्ये सर्व डॉक्टरांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपुरच्या वतीने करण्यात आले आहे.
SHARE THIS