Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जानेवारी २८, २०२१

राज्यस्तरीय पाचवी लिहित्यांची कार्यशाळा

राज्यस्तरीय पाचवी लिहित्यांची कार्यशाळा




नागपूर : आकांक्षा मासिक, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नागपूर आणि कवी लेखक संघटना नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पाचवी लिहित्यांची कार्यशाळा आम्ही आयोजित करीत आहोत. कोरोना नंतर प्रथमच आपण बाहेर निघून संपूर्ण साहित्यिक वातावरणात प्रत्यक्ष वावरणार आहोत.याच उद्देशाने आणि परस्परांमध्ये नीट संवाद व्हावा, यासाठी आपण निवासी कार्यशाळा आयोजित केलेली आहे. यापूर्वीच्या 4 यशस्वी कार्यशाळांचा अनुभव आपल्या गाठीस आहेच.या कार्यशाळेत कथा, कविता, ललित असे तीन आकृतिबंध, कथाकथन आणि कविसंमेलन असे सत्र असतील.
दि.13/14 मार्च 2021 ला सेवाग्राम येथे नियोजित कार्यशाळा आयोजित केलेली आहे. दोन दिवसांच्या या कार्यशाळेचे नोंदणी शुल्क 1000 रु(प्रत्येकी) आहे.यात निवास व्यवस्था, जेवण, नाश्ता, चहा अशी दोन दिवस व्यवस्था असेल.हा पूर्ण कार्यक्रम सेवाग्राम परिसरातच असणार आहे. कार्यशाळेत सहभागी प्रत्येक व्यक्तीला प्रमाणपत्र मिळेल.लिहिलेले फाडु नको, तर किमान आमच्यापर्यंत पोचू दे* *हाच या कार्यशाळेचा उद्देश आहे. नवोदितांना शोधणे,त्यांना वाव देणे, लिहिते करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे*
नोंदणी सुरू झालेली आहे.केवळ 100 नोंदनी धारकांनाच प्रवेश आहे. काहीही शंका, चौकशी असल्यास मला (अरुणा सबाने) *9970095562* या मो.न.वर संपर्क करू शकता. बँक details असे आहे.*Aruna sabane
Ac n 30076944119
S B I bank,surendr nagar branch,nagpur
Ifsc sbin0008239.
अधिक माहितीसाठी सुजाता लोखंडे,9730687372 मंजुषा सावरकर,9423411256,वंदना वनकर 7517791036, कीर्ती काळमेघ9503213607,,वसुधा वैद्य 9423614932 यांच्याशी संपर्क करावा.
ही कार्यशाळा स्त्री/पुरुष सर्वांसाठी खुली आहे.
अरुणा सबाने
संपादक आकांक्षा मॅगेझिन
आयोजक :पाचवी राज्यस्तरीय लिहित्यांची कार्यशाळा

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.