शंकर जाधव
"आपले आवडते पुस्तक
. ...........................
प्रा. मीनलताई येवले लिखित "एकांताचे कंगोरे "हा ललित संग्रह नुकताच माझ्या हाती पडला. यावर मी लिहिण्याचा अल्पसा प्रयत्न करीत आहे.
ह्या ललित संग्रहात मीनलताईनी निसर्गाचे, फुलापानांचे, फळातील माधुर्य, वृक्षांची सावली, त्याचं विस्तारणं ,विविध ॠतूंचे वर्णन,पावसाची नानाविध रूपं, सणवार,स्रीयांचे सामाजीक- कौटूंबीक प्रश्न असे विविध प्रश्न हाताळलेले आहेत. यांत व्यक्तिचित्रण, प्रवास वर्णन,प्रसंग,संवाद ,जीवनाचे संदर्भ ,सामजीक जीवन, वंचितांचे प्रश्न ,महिलांचे प्रश्न हे सारे या ललित संग्रहात लेखिकेने आवर्जून हाताळले आहे.
ताईंनी नित्य-अनुभवास कलापूर्ण रूप दिले आहे.जीवनाभिमुख जीवनाचे वास्तव रूप प्रकट करण्याची प्रेरणा या लेखामागे जाणवते. सावित्रीबाई फुले यांच्या अमोल कार्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लेखिकेने " नाही फिटायचे माये तुझे ॠण" हा लेख लिहिला आहे.
नात्यांचे अनुबंध जपणारे रक्षाबंधन, अक्षरधन, लाभले आम्हांस भाग्य, हे लेख याच प्रेरणेतून लिहिल्याचे जाणवते. तसेच निसर्ग- सौंदर्याची काव्यात्म वर्णने पानोपानी बघायला मिळतात. त्यांचे पैंजण, मी रंगच राधा झाले ,सुजनाचे पूजन हे लेख अप्रतिम आहेत. पैंजण या लेखातली "ती" आपल्याला खूप ओळखीची, जवळची, परिचित वाटते.कवि-वृतीने ते अभिव्यक्त करण्याची लेखिकेची शैली मराठी साहित्यातील कितीतरी कवितांचे समृध्द संदर्भ देत बहरले आहे. वास्तव टिपतांना उत्स्फूर्तता व सहज आविष्कार यातून हे ललित लेख आकारास आलेले दिसतात. वाचक- लेखणाचे स्नेहाचे नाते ज्या हळव्या आत्मनिवेदनातून जुळले-त्यात महिलांचे अनुभव विश्व, प्रकट चिंतन हे स्री-विश्वाचे प्रतिनिधिक चित्रण करणारे आहे. सार्या स्री- जातीचे जगणे, तिची धडपण, घुसमट पचवणारी स्त्री या लेखातून आपल्या अंत्तर्मनाला साद घालते.
प्रत्तेक ऋतूने फिरवलेले निसर्गाचे चक्र , त्यांच्या "काहिली येरे बा पावसा,ॠतू हिरवा, पानगळ अशा काव्यमय शीर्षक असणार्या ललित लेखातून अवतरते. या ललित लेखामधून अनेक वेळा लिहिणायाच्या ओघात लेखिकेच्या आत्मनिवेदनाचे अंश, अस्फूट छटा घेत येतात.काही लेखातून लेखिकेने साहित्य निर्मितीच्या प्रक्रियेचा शोध घेतल्याचे जाणवते.काही संवेदनशील लिहिल्या मनाची तरल, तगमग क्षण सुध्दा या लेखातून हळुवारपणे व्यक्त झाली आहे.कितीतरी अवघड विषयांचे धागे हळुवारपणे गुंफले आहेत. ग्रामीण- शहरी भागातले स्त्रीयांचे ज्वलंत प्रश्न, एकत्र कुटूंबातले प्रश्न, निसर्गाचे प्रश्न ,सर्व सणवार चैत्र ते फाल्गुन या महिन्यांचे आवर्जून वर्णन केलेले आहे. "एकांताचे कंगोरे" हा ललित संग्रह पुस्तक वाचकांना नक्की भावणारं आहे यात तिळमात्र शंका नाही.
शंकर जाधव
7875015199