जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सावली नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्ता मेळावा घेऊन कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. सावली नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा विजय होईल. जन हिताच्या कामांचे व विकास कार्याचे धोरण काँग्रेस पक्ष राबवत आहे, असेही हे यावेळी म्हणाले.
नगरपरिषदेचा व नगरपंचायतीचा नोव्हेंबर व डिसेंबर २०२० मध्ये मुदत संपुष्टात येणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर नगरपरिषद ,सावली नगरपंचायत ,पोभूर्ण नगरपंचायत / नगरपरिषदचे प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील दोन नगरपंचायत व एका नगरपरिषद निवडणुकीचे पडघम वाजणार असून, फेब्रुवारीत निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. या तिन्ही ठिकाणी १ नोव्हेंबर२०१५ रोजी निवडणूक पार पडली होती. त्यानुसार त्यांचा कालावधी संपुष्टात आला असून, निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केल्यानें राजकिय मोर्चे बांधणीला वेग आला आहे.