नागपूर/कळमेश्वर :
राज्यात बर्ड फ्लूच्या शिरकावानंतर पश्रुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर आला आहे. मात्र, कळमेश्वर तालुक्यातील उबगी येथील पोल्ट्री फार्ममधील २५० कोंबड्यांच्या मृत्यूला डीजेचा गोंगाट कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज पशुसंवर्धन विभागाने लावला आहे. या कोंबड्यांच्या मृत्यूचे वैद्यकीय कारण अद्याप अस्पष्ट आहे.कॉकरेल फीड उपलब्ध 9175937925 |
१.५ FCR ब्रॉयलर फीड उपलब्ध 9175937925 |
उबगीच्या पोल्ट्री फॉर्ममध्ये जवळपास १२ हजारांवर कोंबड्या आहेत. फॉर्मजवळ रविवारी झालेल्या एका कार्यक्रमात डीजे वाजविण्यात आला होता. त्या डीजेच्या आवाजाने कोंबड्यांमध्ये गोंधळ उडाला. एकाच बाजूने सर्व कोंबड्या गोळा झाल्या. त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीने कोंबड्यांचा मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज आहे.
गावरान फीड उपलब्ध 9175937925 |
स्रोत:लोकमत