Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जानेवारी ०४, २०२१

कॉंग्रेसचे संघटन व कॉंग्रेसचे सरकार

ओळख कर्तृत्वाची !! 4 !!

कर्मवीर मा.सा.उपाख्य दादासाहेब कन्नमवार


1947 मध्ये अखिल भारतीय कॉंग्रेसचे मुंबईला अधिवेशन झाले. डॉ. राजेंद्र प्रसाद कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. या अधिवेशनात कॉंग्रेसचे संघटन व कॉंग्रेसचे सरकार यात कसे संबध असावे याबाबतीत कन्नमवारांनी भाषण केले. ते भाषण कन्नमवारांच्या सहकाऱ्यांना पसंद पडले. तसेच नागपूर प्रदेशातील त्यावेळची परिस्थिती लक्षात घेता कन्नमवारांना नागपूर प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनवावे असा निर्णय त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला.

1948 मध्ये नागपूर प्रदेश कॉंग्रेस कमिटीची निवडणूक आली. प्रांताध्यक्ष पदासाठी श्री.पूनमचंद रांका आणि श्री.मा.सा.कन्नमवार असे दोघे उभे राहीले.काही सहकारी कन्नमवारांच्या बाजूने असल्याने श्री.पूनमचंद रांका यांनी माघार घ्यावे अशी प्रयत्न केले आणि श्री.मा.सा.कन्नमवार नागपूर प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनले.

दादासाहेब कन्नमवार नागपूर प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष असतांना 1952 मध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. त्यावेळी प्रत्येक प्रांतातून उमेदवारांची यादी पाठविण्याचे काम सुरू झाले.पंडीत जवाहरलाल नेहरू हे अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाची सभा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नागपूर प्रांताचा क्रम आला तेव्हा दादासाहेब कन्नमवार आपल्या उमेदवाराची यादी घेऊन बोर्डापुढे आले. पार्लमेंटरी बोर्डापुढे आपली यादी मंजूर करवून घेताना त्यांनी दाखविलेली निर्भयता निर्णायक ठरली. कॉंग्रेसच्या इतिहासात हे एकच असे उदाहरण असावे ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या इच्छेविरुद्ध प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षाच्या इच्छेनुसार उमेदवारांची निवड करण्यात आली. याचे कारण कन्नमवारांच्या नेत्रुत्वाचा पंडित जवाहरलाल नेहरू व पार्लमेंटरी बोर्डाच्या इतर सभासदांवर पडलेला प्रभाव, नीट युक्तीवाद करून त्यांनी आपल्या उमेदवारांचा गुणवत्ता मांडली. 1952 च्या सार्वजनिक निवडणुका होऊन कन्नमवार मंत्रिमंडळात गेले. तेव्हा त्यांच्या रिक्त झालेल्या प्रांताअध्यक्षाच्या जागेवर मदनगोपाल अग्रवाल यांना अध्यक्ष बनवावे असे कन्नमवारांचे मत होते.परंतु पंडीत रविशंकर शुक्ला अग्रवाल यांना अध्यक्ष करायला तयार नव्हते.




तेव्हा कन्नमवारांनी स्पष्ट शब्दात शुक्लाना सांगितले की *"शुक्लाजी, अध्यक्ष तर मदनगोपाल होतील"* शेवटी शुक्लाजींना मदनगोपाल अग्रवाल यांना अध्यक्ष बनविणे भाग पडले. खंबीर नेत्रुत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व, मनमिळाऊ स्वभाव आणि सतत देशसेवेच्या कार्यात योगदान असल्यामुळे दादासाहेब कन्नमवारांचा विविध क्षेत्रात प्रभाव दिसून येते.


खिमेश बढिये
(नागपूर)
प्रचारक
दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समिती नागपूर
8888422662, 9423640394

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.