सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचे सावली तहसीलदारांना निवेन
सावली/ प्रतिनिधी
ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यापुर्वी काढण्यात यावे, या मागणीसाठी सावली तालुक्यातील नागरिकांनी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
मार्च २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधी मध्ये घेण्यात येणा-या राज्यातील १४२३४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी काढण्यात यावी, आतापर्यंत सरपंचपदाची आरक्षण सोडत ही निवडणूक निकालापूर्वी काढण्यात आलेली होती. परंतू ही परंपरा असतांना सुध्दा राज्यात अचानक ग्रामपंचात निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आलेला आहे. यामुळे कार्यक्षम व्यक्ती ज्याची ग्रामविकासाची तळमळ आहे, अश्या व्यक्ती प्रत्यक्ष निवडणूकीपासून ख-या गुणवत्ताधारक उमेदवाराला गावचा सरपंच करण्याचा मानस असल्यास अलिप्त राहतील. अनेकदा चांगल्या व्यक्तीमत्वाचे उमेदवार अशा धोरणामुळे निवडणूकीपासून दुर होतील व गावाचा विकास खुटेल. चंद्रपूर जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण उमेदवारी अर्ज भरण्यापुर्वी काढावे, अशी मागणी तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी केली आहे.