⭕ खिशात ठेवताच चार्ज होईल मोबाईल ⭕
____________________________
💢 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 💢
____________________________
दि. १६ डिसेंबर २०२०
फेसबुक लिंक http://bit.ly/34i51vJ
लंडन: मोबाईल फोनचे चार्जिंग ही एक नसती कटकटच असते. मात्र, हल्ली ही समस्या दूर करण्यासाठी अनेक उपाय शोधले जात आहेत. आता तर चक्क कपड्यांपासूनच मोबाईल फोन आणि टॅबलेट चार्ज होऊ शकतील, असे संशोधन झाले आहे. नॉटिंघम ट्रसेंट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी एक असे सोलर पॅनेल बनवले आहे जे शर्टाच्या खिशालाही लावता येते. त्याच्या सहाय्याने खिशात ठेवलेला मोबाईल फोनही चार्ज होऊ शकेल.╔══╗
║██║ _* ⸽⸽M⸽⸽ⒶⒽⒾⓉⒾ*_
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
या उपकरणाला ‘चार्जिंग डॉक’ असे नाव देण्यात आले आहे. एक फोनला चार्ज करण्यासाठी 2000 पॅनेलची गरज असते. या संपूर्ण पॅनेलचा आकार 3 मिलीमीटर लांब आणि 1.5 मिलीमीटर रूंद आहे. सोलर पॅनेलच्या या तंत्राने कार्बन उत्सर्जन कमी होऊ शकते. पोषाखाचा खिसा एखाद्या पॉवर बँकसारखेच काम करू शकेल. तिथे कोणत्याही सॉकेटची गरज भासणार नाही. ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ, ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ_* *सोलर पॅनेलने चार्जिंग होत असताना त्याची जाणीवही मनुष्याला होणार नाही. खिशाला लावण्यात येणार्या चिपला रेजिनने आच्छादित केलेले असते. त्यामुळे कपडे धुताना त्यावर पाण्याचा परिणाम होणार नाही. हे कपडे अन्य सर्वसाधारण कपड्यांप्रमाणेच आपण परिधान करू शकतो. खिशात लावलेले 2 हजार सोलर सेल्स कोणत्याही स्मार्टफोनला चार्ज करण्यासाठी पुरेसे आहेत. संशोधकांच्या पथकाचे प्रमुख तिलक डियास यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक पॉवरसाठी ई-टेक्स्टाईल एक गरज आहे. यावर आतापर्यंत अधिक काम झालेले नाही; पण आता नवी दालने खुली होत आहेत.
=========================
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 🎖
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. _*ጦඹիiᎢi*_