Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

संशोधन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संशोधन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, फेब्रुवारी ०५, २०२१

 ‘५-जी’ चाचणी ठरली पक्ष्यांसाठी प्राणघातक

‘५-जी’ चाचणी ठरली पक्ष्यांसाठी प्राणघातक

⭕  ‘५-जी’ चाचणी ठरली पक्ष्यांसाठी प्राणघातक    ⭕

____________________________

💢 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 💢
____________________________
दि. ५ फेब्रुवारी २०२१

Facebook link http://bit.ly/3jhRU42
             हेग-संपूर्ण जगाला सध्या ‘4 -जी’ नंतर आता ‘5-जी’ नेटवर्कची प्रतीक्षा लागून राहिली आहे. अनेक देशांमध्ये ‘5-जी’ नेटवर्कच्या चाचण्यांना सुरुवातही करण्यात आली आहे. मात्र, चाचण्यांना सुरुवात होताच  या नेटवर्कमधील दोषही दिसू लागले. यामुळे हे नेटवर्क पक्ष्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करणार का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कारण नेदरलँडमधील ‘हेग’ या शहरात ‘5-जी’ नेटवर्कची चाचणी सुरू असतानाच एक, दोन नव्हे तर तब्बल 300 हून अधिक पक्षी अचानक मृत पावले. ही गंभीर आणि दुर्दैवी घटना ‘5-जी’ नेटवर्कमधून बाहेर पडणार्‍या ‘रेडिएशन’मुळे घडल्याचे सांगण्यात येत आहे.


╔══╗ 
║██║       ⸽⸽M⸽⸽ⒶⒽⒾⓉⒾ
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
संपूर्ण जगभरात ‘5-जी’ नेटवर्कबाबत लागून राहिलेली प्रतीक्षा पाहून अनेक नामवंत स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी आतापासूनच कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. या कंपन्या लवकरच बार्सिलोना येथे होणार्‍या ‘मोबाईल वर्ल्ड काँग्रेस’मध्ये‘ 5-जी’ या वेगवान नेटवर्कला सपोर्ट करणारे मोबाईल सादर करत आहेत. मात्र, याचवेळी या नेटवर्कमुळे होणारे संभाव्य नुकसानही हेगमधील घटनेने पुढे येत आहे. ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ,  ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿबार्सिलोनात होत असलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ बर्लिन, ईटीएच झुरिक, नॉर्वेच्या सिन्तेफ डिजिटल रिसर्च आदी संस्थेच्या संशोधकांनी आपले अहवाल सादर केले आहेत. यामध्ये संशोधकांनी ‘5-जी’ नेटवर्कमुळे होणार्‍या रेडिएशनमुळे पक्षी, लहान कीटक यांच्या जीवाला धोका निर्माण होणार असल्याचा उल्लेख केला आहे. यामुळे या धोक्यांवर मात करण्यासाठी सध्या संशोधन सुरू असल्याचे समजते.
=========================
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🎖    
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            ጦඹիiᎢi

गुरुवार, जानेवारी २८, २०२१

आता मनातील विचारही दुसर्याला कळतील!

आता मनातील विचारही दुसर्याला कळतील!

🔵 संशोधन 🔵
_____________________

⭕ आता मनातील विचारही दुसर्याला कळतील! ⭕

____________________________
🌀 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 🌀
____________________________
दि. २८ जानेवारी  २०२०

फेसबुक लिंक http://bit.ly/2Yk7Mta
न्यूयॉर्क : सिद्धपुरुषांना दुसर्याच्या मनातील विचारही कळतात, असे म्हटले जाते. कुणी आपल्या मनातील योगायोगाने ओळखले तर आपण त्याला ‘तू मनकवडा आहेस का?’ असे विचारतो. मात्र, विज्ञानाच्या सहाय्यानेही आता दुसर्याच्याडोक्यात काय सुरू आहे हे ओळखतायेऊ शकेल. मॅसाच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये काम करणार्या भारतीय वंशाच्या अर्णव कपूर संशोधकाने ही बाब वास्तवात उतरवली आहे. अर्णव आणि त्याच्या टीमने ‘अल्टर इगो’ नावाचे असे एक उपकरण तयार केले आहे जे आवाजाशिवाय डोक्यात सुरू असलेले विचार जाणून घेते आणि मोबाईल किंवा संगणकाच्या मदतीने हे विचार लोकांना उलगडून सांगते. 

              
╔══╗ 
║██║      _*M⃟   a⃟   h⃟   i⃟   t⃟   i⃟  
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
____________________________
आपल्या डोक्यामध्ये अनेक गोष्टींचे विचार सुरू असतात. शांत बसलो की आपल्याला अनेक गोष्टी आठवायला लागतात, शांतपणे केलेला अभ्यासही चांगला लक्षात राहतो. या प्रक्रियेला ‘सबव्होकलायजेशन’म्हणतात. ‘अल्टर इगो’ हे उपकरण याच सर्व बाबींना आपल्यासमोर मांडते. चेहर्यावर हे उपकरण लावून आवाजाशिवाय कोणते विचार सध्या डोक्यात सुरू आहेत हे समजण्यास मदत होते.M҈ a҈ h҈ i҈ t҈ i҈  S҈ e҈ v҈ a҈  g҈ r҈ o҈ u҈ p҈ ,҈  P҈ e҈ t҈ h҈ v҈ a҈ d҈ g҈ a҈ o҈ n҈   शरीरातील पेशी, हाडे याचे न्यूरोमस्न्यूलर संकेत अल्टरइगो मशीन मानवाला समेजल अशा भाषेत रूपांतरित करून सांगते. या उपकरणाच्या माध्यमातून संगणकाला ही सगळी माहिती मिळत असते, जी शब्दांच्या किंवा आवाजाच्या स्वरूपात इतरांपर्यंत पोहोचवता येते. सध्या ‘अल्टर इगो’ या उपकरणाचा वापर हा बुद्धिबळाच्या खेळात विरोधी खेळाडूच्या डोक्यात सध्या काय खेळी सुरू आहे, तो पुढे कोणती चाल करणार हे समजण्यासाठी केला जातो.

___________________________
*ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
_*🔵 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव  🔵*_
______________________________

बुधवार, डिसेंबर १६, २०२०

खिशात ठेवताच चार्ज होईल मोबाईल

खिशात ठेवताच चार्ज होईल मोबाईल

⭕  खिशात ठेवताच चार्ज होईल मोबाईल    ⭕

____________________________

💢 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव  💢
____________________________
दि. १६ डिसेंबर  २०२०

फेसबुक लिंक http://bit.ly/34i51vJ
             लंडन: मोबाईल फोनचे चार्जिंग ही एक नसती कटकटच असते. मात्र, हल्ली ही समस्या दूर करण्यासाठी अनेक उपाय शोधले जात आहेत. आता तर चक्‍क कपड्यांपासूनच मोबाईल फोन आणि टॅबलेट चार्ज होऊ शकतील, असे संशोधन झाले आहे. नॉटिंघम ट्रसेंट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी एक असे सोलर पॅनेल बनवले आहे जे शर्टाच्या खिशालाही लावता येते. त्याच्या सहाय्याने खिशात ठेवलेला मोबाईल फोनही चार्ज होऊ शकेल.


╔══╗
║██║      _* ⸽⸽M⸽⸽ⒶⒽⒾⓉⒾ*_
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
या उपकरणाला ‘चार्जिंग डॉक’ असे नाव देण्यात आले आहे. एक फोनला चार्ज करण्यासाठी 2000 पॅनेलची गरज असते. या संपूर्ण पॅनेलचा आकार 3 मिलीमीटर लांब आणि 1.5 मिलीमीटर रूंद आहे. सोलर पॅनेलच्या या तंत्राने कार्बन उत्सर्जन कमी होऊ शकते. पोषाखाचा खिसा एखाद्या पॉवर बँकसारखेच काम करू शकेल. तिथे कोणत्याही सॉकेटची गरज भासणार नाही. ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ,  ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ_* *सोलर पॅनेलने चार्जिंग होत असताना त्याची जाणीवही मनुष्याला होणार नाही. खिशाला लावण्यात येणार्‍या चिपला रेजिनने आच्छादित केलेले असते. त्यामुळे कपडे धुताना त्यावर पाण्याचा परिणाम होणार नाही. हे कपडे अन्य सर्वसाधारण कपड्यांप्रमाणेच आपण परिधान करू शकतो. खिशात लावलेले 2 हजार सोलर सेल्स कोणत्याही स्मार्टफोनला चार्ज करण्यासाठी पुरेसे आहेत. संशोधकांच्या पथकाचे प्रमुख तिलक डियास यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक पॉवरसाठी ई-टेक्स्टाईल एक गरज आहे. यावर आतापर्यंत अधिक काम झालेले नाही; पण आता नवी दालने खुली होत आहेत.

=========================
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🎖    
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            _*ጦඹիiᎢi*_

शुक्रवार, जून ०८, २०१८

 चंद्रपुरात उभे राहणार मत्स्य संशोधन व प्रशिक्षण केंद्र

चंद्रपुरात उभे राहणार मत्स्य संशोधन व प्रशिक्षण केंद्र

चंद्रपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्राला दूध अंडी आणि मासळी या आवश्यक खाद्यपदार्थांसाठी स्वयंपूर्ण बनविण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. त्यासाठी पूर्व विदर्भातील भूजलसाठ्याचा वापर करण्यात येणार आहे. विदर्भातील पारंपारिक मत्स्यव्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाचा, संशोधनाचा व अद्ययावत सुविधांचा हातभार लावत राज्याची या क्षेत्रातील स्वयंपूर्णता वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर आज चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायिकांनपुढे व्यक्त केला.
चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात गुरुवारी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायकाची ची बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्य शासन दर महिन्याला 450 कोटी रुपयांचे दूध, अंडी आणि मासळी अन्य राज्यातून आयात करत असल्याचे महादेवराव जानकर यांनी सांगितले. मात्र ही आयात बंद करून राज्याच्या तिजोरीला आणि स्वयंपूर्णतेला विदर्भातील मत्स व्यवसायिक व शेतकरी मदत करू शकतात. त्यामुळेच गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायाला गती देण्यासाठी अनेक प्रयोग आगामी वर्षभरात केले जाणार आहेत. 
चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या भागांमध्ये तलाव व जलसाठे मोठ्या प्रमाणात आहेत.या भागामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायाला चालना मिळू शकते. या पद्धतीच्या व्यवसायाची पाळेमुळे या ठिकाणी रुजलेली आहे. त्याला आधुनिक स्वरूप देऊन. आवश्यक मदत देऊन. प्रशिक्षण व संशोधन उपलब्ध करून आणखी गती देण्याचा राज्य शासनाचा मानस असून त्यासाठी या दोन जिल्ह्यांमध्ये या व्यवसायाला मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आज या दोन्ही नेत्यांनी मत्सव्यवसायिकांची चर्चा करताना आगामी काळात मत्स्यबीज निर्मिती ते मासळीची निर्यात या दोन्हीही घटकांना साध्य करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू करण्याबाबत घोषणा केल्यात. 
दुपारी एक वाजता सुरू झालेल्या बैठकीमध्ये राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त अरुण विधळे, महाराष्ट्र पशुसंवर्धन व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू आशितोष पातुरकर, चंद्रपूर जिल्हा मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील जांभुळे, चंद्रपूर बांधकाम विभागाचे अभियंता जुनारकर यांनी विदर्भातील मत्स्यव्यवसाय, मत्स्यव्यवसाय संशोधनाची विदर्भातील गरज, चंद्रपूर जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायिकांची सद्यस्थिती व फिश मार्केट उभारण्याची आवश्यकता आदींबाबत सादरीकरण केले. या सादरीकरणसोबतच याठिकाणी उपस्थित असणार्‍या मत्स व्यवसायिकांची मत्स तथ्‍यांबद्दल घेण्यात आली. कोणतेही प्रकल्प उभारताना स्थानिक व्यावसायिकांच्या मतांचा आदर करा ,असे निर्देश यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. या सादरीकरणामध्ये महाराष्ट्रातील पहिले गोड्या पाण्यातील मत्स्य संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारणीबाबत महाराष्ट्र पशुसंवर्धन व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्यामार्फत प्राप्त झाला असून याठिकाणी या केंद्राची आवश्यकता असल्याचे निष्कर्ष आजच्या बैठकीत विद्यापीठाचे कुलगुरू आशिष पातुरकर यांनी मांडले. 
पाण्याची उत्तम सुविधा असणाऱ्या आणि संपर्काची साधने उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी काही हेक्टर परिसरात राज्यातील हे पहिले केंद्र उभे राहणार आहे. या केंद्रामध्ये मत्स्यबीज निर्मिती, शोभिवंत माशांच्या प्रजातींची निर्मिती प्रजनन केंद्र व्यवसाय संशोधन कमी पाण्यातील मत्स्यबीज निर्मिती याबाबतचे संशोधन व विकास कार्य चालणार आहे. उभय नेत्यांनी या प्रकल्पासाठी तत्वतः मान्यता आज दिली आहे. तथापि, योग्य जागा शोधण्याची निर्देश पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिले. 
आजच्या बैठकीमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायिकांच्यावतीने जिल्ह्यातील काही समस्या महादेव जानकर यांच्या लक्षातआणून दिल्या. या भागातील मत्स्य व्यवसायाला गती देण्यासाठी या विभागातील रिक्त पदांची भरती करण्यात यावी, दोनशे विद्यार्थ्यांना जेवण व राहण्याच्या व्यवस्थेसह प्रशिक्षित करण्यात यावे, मत्स्यखाद्य निर्मितीला चालना द्यावी, आधुनिक व स्वस्त दराच्या बोटी मासेमारीसाठी उपलब्ध करण्यात याव्यात, बंद पडलेले मत्स्य बीज निर्मिती केंद्र पुनर्जीवित करण्यात यावे, तलावाचे खोलीकरण करण्यात यावे,बोगस संस्था बंद करण्यात याव्यात,लघु मत्स खादय कारखाना निर्मितीसाठी अनुदान देण्यात यावे व मत्स्यबीज ते मार्केटिंग असा प्रकल्प जिल्ह्यात कार्यान्वित व्हावा अशी सूचना केली. 
यावेळी महादेव जानकर यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्रालयाला वाढीव निधी मिळालेला असून विभागाच्या बळकटीकरणासाठी त्यांचा हातभार व आशीर्वाद मिळाल्याचे विनम्रपणे सांगितले. त्यामुळे मुनगंटीवार यांनी केलेल्या सर्व सूचना महिनाभराच्या आत अंमलात येतील. पुढच्या बैठकीला आपण स्वतः उपस्थित राहून याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेऊ असे आश्वासन महादेव जानकर यांनी दिले.26 जुलै रोजी यासंदर्भातली बैठक होणार असून पुढील एक वर्षाच्या नियोजनबद्ध कालावधीत चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यांमध्ये मत्स्यव्यवसायाला पूरक असणाऱ्या यंत्रणांची निर्मिती,आवश्यक मनुष्यबळ व अधिकाऱ्यांची नियुक्ती, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य संशोधन व प्रशिक्षण केंद्राची निर्मिती, चंद्रपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, गडचांदूर याठिकाणी फिश मार्केटची उभारणी, जलाशयाच्या ठेका देण्याच्या रकमेमध्ये कपात करण्याचा अध्यादेश काढणे, आदी महत्त्वपूर्ण निर्णयाची पूर्तता करण्याबाबत निर्णय होणार आहे. 
आजच्या या महत्त्वपूर्ण बैठकीला दोन्हीही मंत्र्यांसोबत चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे,महापौर अंजली घोटेकर, गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती भांडेकर, आमदार देवरावजी होळी, जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, विदर्भ मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष प्रकाश लोणारे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनोहर पउनकर, महाराष्ट्र पशुसंवर्धन व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू आशिष पातुरकर, सहआयुक्त मत्स्यव्यवसाय विनोद नाईक, प्रादेशिक आयुक्त मत्स्यव्यवसाय रवींद्र वायडा,आदींसह चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय, मत्स्यव्यवसाय संबंधातील विविध संघटनांचे पदाधिकारी, पारंपारिकरित्या मत्स्यव्यवसाय करणाऱ्या समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
यामध्ये प्रामुख्याने नगरसेवक राजू गोलीवार,माजी नगरसेवक बंडू हजारे, डॉ. शिवरकर,दामोदर रूयारकर व चांदा जिल्हा मत्स्यव्यवसाय सहकारी संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी जितेश केशवे यांनी केले.