🔵 संशोधन 🔵
_____________________
⭕ आता मनातील विचारही दुसर्याला कळतील! ⭕
____________________________
🌀 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 🌀
____________________________
दि. २८ जानेवारी २०२०
फेसबुक लिंक http://bit.ly/2Yk7Mta
न्यूयॉर्क : सिद्धपुरुषांना दुसर्याच्या मनातील विचारही कळतात, असे म्हटले जाते. कुणी आपल्या मनातील योगायोगाने ओळखले तर आपण त्याला ‘तू मनकवडा आहेस का?’ असे विचारतो. मात्र, विज्ञानाच्या सहाय्यानेही आता दुसर्याच्याडोक्यात काय सुरू आहे हे ओळखतायेऊ शकेल. मॅसाच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये काम करणार्या भारतीय वंशाच्या अर्णव कपूर संशोधकाने ही बाब वास्तवात उतरवली आहे. अर्णव आणि त्याच्या टीमने ‘अल्टर इगो’ नावाचे असे एक उपकरण तयार केले आहे जे आवाजाशिवाय डोक्यात सुरू असलेले विचार जाणून घेते आणि मोबाईल किंवा संगणकाच्या मदतीने हे विचार लोकांना उलगडून सांगते. ╔══╗
║██║ _*M⃟ a⃟ h⃟ i⃟ t⃟ i⃟
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
____________________________
आपल्या डोक्यामध्ये अनेक गोष्टींचे विचार सुरू असतात. शांत बसलो की आपल्याला अनेक गोष्टी आठवायला लागतात, शांतपणे केलेला अभ्यासही चांगला लक्षात राहतो. या प्रक्रियेला ‘सबव्होकलायजेशन’म्हणतात. ‘अल्टर इगो’ हे उपकरण याच सर्व बाबींना आपल्यासमोर मांडते. चेहर्यावर हे उपकरण लावून आवाजाशिवाय कोणते विचार सध्या डोक्यात सुरू आहेत हे समजण्यास मदत होते.M҈ a҈ h҈ i҈ t҈ i҈ S҈ e҈ v҈ a҈ g҈ r҈ o҈ u҈ p҈ ,҈ P҈ e҈ t҈ h҈ v҈ a҈ d҈ g҈ a҈ o҈ n҈ शरीरातील पेशी, हाडे याचे न्यूरोमस्न्यूलर संकेत अल्टरइगो मशीन मानवाला समेजल अशा भाषेत रूपांतरित करून सांगते. या उपकरणाच्या माध्यमातून संगणकाला ही सगळी माहिती मिळत असते, जी शब्दांच्या किंवा आवाजाच्या स्वरूपात इतरांपर्यंत पोहोचवता येते. सध्या ‘अल्टर इगो’ या उपकरणाचा वापर हा बुद्धिबळाच्या खेळात विरोधी खेळाडूच्या डोक्यात सध्या काय खेळी सुरू आहे, तो पुढे कोणती चाल करणार हे समजण्यासाठी केला जातो.
___________________________
*ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
_*🔵 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 🔵*_
______________________________