जुन्नर /वार्ताहर
जुन्नर येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक म्हणाले की डॉ.बाबासाहेबांनी 'भारतीय राज्यघटना' नावाचा महान ग्रंथ भारत देशास देऊन लोकशाही स्थापन केली. डॉ.बाबासाहेब जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, शेतकरी व कामगारांचे कैवारी, बहुजन समाजाचे उद्धारक, समता व मानवतावादी आचार-विचारांचे पुरस्कर्ते होते. डॉ.बाबासाहेबांनी आपल्या वाणीतून, काव्यातून व पत्रकारितेतून विचार व संवादाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे अविस्मरणीय कार्य केलेले आहे. आशा महान महामानवाचे आपण स्मरण करणे आवश्यक आहे. सिनीयर महाविद्यालयातील शास्त्र शाखा प्रमुख प्रा. अनिल कहाणे, कला शाखा प्रमुख डॉ.अभिजित पाटील एम.सी.व्ही. सी. प्रमुख प्रा.नेटके, प्रा.कसबे, प्रा.वाघचौरे या प्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन श्री. फिरोज इनामदार, श्री. ढोले व श्री. नवले यांनी केले.