Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, डिसेंबर ०३, २०२०

डॉक्टर शीतल आमटे यांच्या मोबाईल आणि लॅपटॉपला डोळ्यांचे पासवर्ड

नागपूर / प्रतिनिधी
आनंदवनच्या डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्या प्रकरणात तपासासाठी साहित्य जप्त करण्यात आले होते. मात्र, डॉ. शीतल यांच्या मोबाईल, लॅपटॉपला डोळ्यांचे पासवर्ड असल्याने ते उघडण्यासाठी अङचण येत आहे.



डॉ. शीतल यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत असून या मृत्यूचे नेमके कारण काय आहे हे शोधण्यासाठी अहवालाची प्रतीक्षा लागलेली आहे आत्महत्येमागील कारण तपासण्यासाठी नोकर, घरगुती काम करणारे आणि नातलग यांची चौकशी करण्यात आली आहे. डॉक्टर शीतल यांनी मोबाईल लॅपटॉप यांना सुरक्षेच्यादृष्टीने स्वत:च्या डोळ्यांचे पासवर्ड ठेवले होते. त्यामुळे ताब्यात घेतलेला टॅब, लॅपटॉप, आणि मोबाईल उघडण्यास अडचणी निर्माण होत आहेत. नागपूरच्या फॅरेन्सिक पथकाने मुंबईतील आयटीतील तज्ज्ञांकडे पाठवले आहेत. या गॅझेट्सच्या साहाय्याने डॉ. शीतल यांच्या आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यास मदत होईल.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.