Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, डिसेंबर १९, २०२०

नागपूरातील अनधिकृत लेआऊटमधील भूखंडधारकांना अडचणी

माजी उपमहापौर शेखर सावरबांधे यांनी दिले पालकमंत्र्यांना निवेदन

अनधिकृत लेआउट मधील भुखंड नियमीतीकरणाची उर्वरीत कारवाई ना.सु.प्र.नेच करावी -
शेखर सावरबांधे यांची पालक मंत्र्यांकडे मागणी




शासनाने जाहीर केलेल्या नागपूर शहरातील ५७२ व १ ९ ०० अनधिकृत लेआऊट मधील भूखंडाचे नियमितीकरण करण्याची प्रक्रीया ना.सु.प्र . तर्फे राबविण्यात येत होती . परंतु ना.सु.प्र . रद्द करण्याच्या प्रक्रीयेचा भाग म्हणून या अनधिकृत लेआऊटस मधील भुखंड नियमितीकरणाचे उर्वरीत काम नागपूर म.न.पा. कडे सोपविण्यात आले . म.न.पा. या संदर्भात अधिक प्रभावीपणे काम करेल असा लोकांचा समज होता , परंतु आता हा समज खोटा ठरला आहे . म.न.पा. ने या कामासाठी आवश्यक यंत्रणा न उभारल्यामुळे लोकांना फार अडचणींना तोंड द्यावे लागते . मनपा चे अधिकारी या विषयाला न्याय देऊ शकले नाही, त्यामुळे अनेक लोकांची प्रकरणे प्रलंबित आहेत, अशी तक्रार माजी उपमहापौर शेखर सावरबांधे यांनी पालकमंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.


अधिकाऱ्यांचे असलेल्या कमी संख्या बळामुळे मनपा या कामाला न्याय देवू शकत नाही असे दिसते . मनपा ही प्लॅनिंग अथारिरटी असल्यामुहे संपूर्ण शहरातील बाांधकामाचे नकाशे सुद्धा नगररचना विभागात मंजूरी साठी येतात त्यामुळे कामाचा अतिरीक्त बोझा मनपाचे हे विभाग करु शकत नाही , त्यामुळे अनधिकृत लेआऊट मधील भुखंड नियमिती करणाचे काम ना .सु.प्र . कडे पून्हा वळते करण्यात यावे अन्यथा ना.सु.प्र.चे २० अभियंता अधिकारी म.न.पा.मध्ये प्रतिनियुक्तीवर पाठवून त्यांचेकडून हे काम करवून घ्यावे . या साठी हे निवेदन सादर करण्यात येत आहे . आपण शासनाच्या संबंधीत विभागाकडून त्यासंबंधीचे आदेश काढून दिल्यास शहरातील त्रस्त नागरीकांना दिलासा मिळेल . तरी आपण कृपया योग्य कारवाई करावी ही विनंती शेखर सावरबांधे, माजी उपमहापौर यांनी केली आहे.

शेखर सावरबांधे यांचे नेतृवात भेटलेल्या या शिष्टमंडळात नंदू थोटे, दीपक आदमने, बालू आशष्टनकर, मुन्ना रफीक, हसमुख पटेल, कुलदीप उपाध्याय, शशिकान्त ठाकरे, सलमान खान, तुषार कोल्हे, किशोर धोटे, प्रशांत वैरागड़े आदि उपस्थित होते

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.