Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, नोव्हेंबर ०३, २०२०

काटोलात ओबीसीचे सर्व पक्षीय यशस्वी आंदोलन katol obc


काटोलात ओबीसीचे सर्व पक्षीय नेते उतरले....

ओबीसी शिष्यवृत्ती वाढवावी

आरक्षण, अनुदान , वस्तीगृहे आदी सुविधा पूर्ण कराव्या

आंदोलन बळकटीकरणाचा निर्धार

काटोल तालुक्यातून पुढे सरसावली युवा मंडळी




काटोल : इतर मागास वर्गीय समाजाच्या विविध मागण्यांकरिता काटोल तहसील कार्यालय समोर मंगळवार दि 3 नोव्हेंबरला ओबीसी संघटना व ओबीसींतील जातसंघटनांनी एकत्रित येऊन आक्रोश आंदोलन केले. तहसीलदारांच्या मार्फत ओबीसी समाजाच्या मागण्यांची निवेदने मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये ,याकरिता माजी आमदार डॉ आशिषजी देशमुख यांच्या नेतृत्वात ओबीसी विविध पक्षाचे पदाधिकारी एकत्रित येऊन यशस्वी आंदोलन पार पाडले.यावेळी कृ उ बा स सभापती तारकेश्वर शेळके, जि प सदस्य समीर उमप, प्राचार्य डॉ विजय धोटे, दिनेश ठाकरे, रमेश फिस्के,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गणेश चन्ने, अजय लाडसे,राजेश डेहनकर , विनायकराव मानकर,न प उपाध्यक्ष सुभाष कोठे, भाजपा तालुका महासचिव विजय महाजन, सामाजिक कार्यकर्ता विजय कडू, प स सदस्य संजय डांगोरे, डॉ अनिल ठाकरे, प्रशांत पवार, मोहन पांडे, रुपेश नाखले, पंकज मानकर, सागर राऊत यांचेसह शेकडो ओबीसी समाज बांधव उत्स्फूर्त उपस्थित झाले होते. ओबीसी महासंघाने निवेदनातीळ मावण्यात
केंद्र सरकारने राष्ट्रीय जनगणनेनुसार ओबीसी समाजाची स्वतंत्र रकान्यात नोंद घ्यावी. महाराष्ट्र सरकारने पाठपुरावा करावा अन्यथा ज्यातील ओबीसी समाजासह सर्वांचीच जातनिहाय जनगणना राज्य सरकारने करावी आदी प्रमुख मागणीसह ओबीसींच्या तुटपुंज्या आरक्षणात अन्य जातींचा समावेश ओबीसींवर अन्याय करणारा आहे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्हावार वसतीगृहे त्वरीत सुरू करावीत, बार्टी आणि सारथीच्या धर्तीवर ओबीसींच्या महाज्योती संस्थेला 1हजार कोटींच्या अनुदानाची भरीव तरतूद करावी,ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वाढवावी ,एससी,एसटी समाजांप्रमाणेच विविवध योजना इतर मागासवर्ग समाजाला ध्यावी त्यांना सवलती लागू कराव्यात अशा महत्वाचे मागण्यांचा समावेश होता.
काटोल तहसीलदार कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात ओबीसी महासंघ कुणबी सेवा संस्था काटोल पदाधिकारी तसेच तेली समाज,माळी समाज ,अन्य अनेक जाती संघटनांचे प्रतिनिधी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. सर्वपक्षीय विविध  जातीचे ओबीसी प्रतिनिधी सहभागी झाल्याने आंदोलनाला बळकटी येत असल्याचे अनेकांनी भावना व्यक्त केल्या..

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.