काटोल/ प्रतिनिधी
नबीरा महाविद्यालय काटोल मध्ये 20 महाराष्ट्र बटालियन एनसीसी युनिट नागपूर कार्यरत असून आजपर्यंत यातून 40 एनसीसी कॅडेट भारतीय सैन्यात दाखल झालेले आहे. हे सर्व सैनिक विविध ठिकाणी कार्यरत आहेत.
यावर्षी चंद्रपूर येथे झालेल्या सैनिक भरती मध्ये चार एनसीसी कॅडेट ची निवड भारतीय सैन्यात झालेली असून त्यांनी "बी" व "सी" प्रमाणपत्र परीक्षा पास केली आहे. यामध्ये आसिफ फारुकी बी. ई. जी. पुणे, करण सोंनकुसरे आर्मड अहमदनगर, कुणाल कोहळे अहमदनगर, सौरभ कुरमी मराठा रेजिमेंट बेळगाव आर्मी सेंटरला रुजू झालेले आहे. या सर्व एनसीसी कॅडेटना प्रोत्साहित करून त्यांना मार्गदर्शन कॅप्टन डॉक्टर तेजसिंह लक्ष्मणराव जगदळे यांनी केले. त्यांच्या नियुक्तीबद्दल ग्रुप कॅप्टन एम. कलिम, कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल अमोद चंदना, प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल संजय कदम, संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजू देशमुख उपाध्यक्ष श्री निरंजनजी राऊत व सर्व सभासद तसेच प्राचार्य डॉ. नविन यांनी अभिनंदन करून त्यांना प्रशिक्षणाकरिता शुभेच्छा शुभेच्छा दिल्या आहेत.